कोल्हापूर
दि. 11 : राज्य शासनाने पिण्याच्या आणि शेतीच्या पाणी पुरवठ्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केले असून राज्यातील अप्ÖæÖÔ धरण/सिंचनप्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राकडून 14 हजार कोटी रुपयांना मंजूरी मिळाल्याची माहिती राज्याचे महसूल तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना दिली.
गडहिंग्लज
तालुक्यातील करंबळी येथे 30 लाख रुपये खर्चून उभारलेल्या ग्रामविकास भवनचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश हाळवणकर, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रा.संजय मंडलिक, गोकूळचे
संचालक बाबा देसाई, माजी आमदार संजय घाडगे आदीजण उपस्थित होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी विकासअण्णा पाटील हे होते. या कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते 56 लाख रुपये खर्चुन उभारलेल्या राष्ट्रीय पेयजल योजना आणि स्ट्रिट लाईट प्रकल्पाचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला.
राज्यातील
अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यास शासनाचे प्राधान्य असून केंद्र शासनाकडून मंजूर
झालेल्या 14 हजार कोटी रुपयांच्या निधीतून कोल्हापूर जिल्ह्यातील अपूर्ण असलेले 8 सिंचन प्रकल्पही मार्गी लावले जातील, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. राज्यातील अपूर्ण सिंचनप्रकल्प पूर्ण करुन राज्यातील शेतीला पाणी उपलब्ध करुन देण्यासही शासनाने प्राधान्य दिले आहे.
राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत 6500 गावात 1 लाख कामे हाती घेण्यात आली असल्याचे संागून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाला लोकांकडून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळत असून यापुढील काळातही जलयुक्त शिवार अभियान गतिमान करुन गावागावात शाश्वत पाणीसाठे निर्माण केले जातील. आगामी काळात या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 33 हजार गावामध्ये जलसंवर्धनाची कामे हाती घेऊन टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमातून लुप्त पावलेल्या नद्या वाहत्या करणे, शेततळी घेणे, पाझर तलाव तसेच माती आणि सिमेंट बंधाऱ्याची कामे घेणे, तलावातील गाळ काढणे अशा जलसंधारणाच्या प्रणालीवर भर देण्यात आला आहे.
बचत गटांना प्रोत्साहन देण्याची राज्य शासनाची भूमीका असल्याचे स्पष्ट करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील
बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाना बाजार पेठ उपलब्ध करुन देण्यासाठी कोल्हापूर शहरानजीक राष्ट्रीय महामार्गावर महिला बचत गट भवन उभारण्याचा संकल्प आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी बचत गटांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी तालुकास्तरावरही बचत गट भवन उभारण्याचा संकल्प असल्याचेही ते
म्हणाले.
गेल्या दोन वर्षात शासनाने गावांच्या सर्वांगिण विकासास प्राधान्य दिल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वसामान्य माणसाला गावातच प्रशासकीय सेवा आणि सुविधा उपलब्ध व्हाव्यात, गावस्तरावर रस्ते, पाणी, आरोग्य या सारख्या पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देऊन गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनविण्यास प्राधान्य दिले आहे.राज्यातील सर्वच गावे समृध्द आणि विकसित करण्याचा शासनाचा मानस असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक म्हणाले, गावाच्या विकासासाठी शासनाने अनेकविध योजना राबवित असून यापुढील काळातही गावाचे प्रश्न प्राधान्य क्रामाने सोडविले जातील. करंबळी गावाने विकास कामात घेतलेल्या पुढाकाराचे त्यानी कौतुक केले. जिल्हयात यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी मुक्त होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रारंभी सरपंच मालुताई इंगळे यांनी स्वागत केले. प्रा. तानाजी चौगुले यांनी प्रास्ताविकात गावाच्या विकासाचा आणि प्रश्नांचा आढावा घेतला. याप्रसंगी समारंभाचे अध्यक्ष विकासअण्णा पाटील, अलोक पाटील, मारुतराव राक्षे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. समारंभास प्रकाश चव्हाण, ग्रामसेवक सोनार यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
0 0 0 00 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.