देशपातळीवरी स्कील इंडिया या संकल्पनेस अनुसरुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातही कुशल महाराष्ट्र, रोजगार युक्त महाराष्ट्र हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून युवक-युवतींचे कौशल्य विकासाद्वारे सक्षमीकरण करुन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान संपूर्ण राज्यभर गतिमान केले आहे. या अभियानासाठी राज्य शासनाने 161 कोटी रुपयाचा नियतव्यय मंजूर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या अभियानाद्वारे सुमारे 2 हजार 600 उमेदवारांना कौशल्य विकासाद्वारे रोजगार, स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
|
राज्य
शासन व केंद्र शासनातील विविध विभागांतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षणासी निगडीत सर्व योजना व कार्यक्रमाखालील निधीची सांगड घालून या कार्यक्रमाच्या एकात्मिक अंमलबजावणीद्वारे 15 ते 45 वयोगटातील उमेदवारांची अधिक मागणी असलेल्या क्षेत्राच्या आवश्यकतेनुसार व्यवसायिक कौशल्य विकास, कौशल्य वर्धन आणि पुनर्कौशल्य विकास करणे व त्यांना रोजगारक्षम करुन रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य दिले आहे. यामध्ये उपेक्षित घटकांच्या सहभागावर अधिक भर दिला आहे.
मेक
इन महाराष्ट्र या धोरणास अनुसरुन राज्याच्या वाढत्या औद्योगिक करणास आणि विविध सेवा उद्योगास कुशल मनुष्यबळ पुरवठ्यातून उत्पादकता वाढविण्यास प्राधान्य दिले आहे. विविध क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या संधी यांचा शोध घेऊन अद्ययावत माहितीच्या आधारे मनुष्यबळाची मागणी व पुरवठ्याचे नियोजन करण्यासही प्राधान्य दिले आहे. यामध्ये शिक्षण विभाग, शिक्षण संस्था, विद्यापीठे, उद्योग समुह इत्यादी कौशल्य क्षेत्राशी निगडीत संस्थांमध्ये समन्वय ठेवून बाजारपेठेतील मागणीनुसार रोजगारक्षम कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे.
प्रमोद
महाजन कौशल्य व उद्योजकता अभियान हे एक सर्वसमावेशक व बहुअयामी अभियान आहे. या अभियानाद्वारे बाजारातील मागणी असलेल्या क्षेत्राच्या गरजेनुसार 15 ते 45 वयोगटातील मनुष्यबळाला कौशल्य विकासातून रोजगारक्षम बनविण्यास प्राधान्य दिले आहे. या अभियानाद्वारे व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रामार्फत लाभार्थ्यांची कल, आवड, क्षमता व कौशल्य चाचणीद्वारे उमदेवारांची निवड करुन त्यांना रोजगार स्वयंरोजगार करण्यास पुरक असे प्रशिक्षण देण्यावर भर दिला आहे. यासाठी शासनाने प्रशिक्षणासाठी समुपदेशन केंद्रे निश्चित केली असून या संस्थांमार्फत प्रशिक्षित झालेल्या उमेदवारापैकी किमान 75 टक्के उमदेवारांना रोजगार स्वयंरोजगार मिळवून देण्याची जबाबदारी संस्थेवर निश्चित केली आहे.
बाजारपेठेत विविध प्रकाराच्या रोजगाराच्या मागणीस अनुसरुन उद्योग समूह/खाजगी संस्थामार्फत आवश्यकतेनुसार सेंटर ऑफ अेक्सलन्स व एकाच छताखाली बाजारपेठेस आवश्यक असणारी कौशल्य निर्माण करुन रोजगार स्वयंरोजगार उपलब्धता करुन देण्याच्या दृष्टीने संबंधित उद्योग समुहाच्या सहकार्याने बहुकौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याबाबतही शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या बेवपोर्टवरुन उमदेवाराच्या नोंदणीपासून मुल्यमापन, समुपदेशन, प्रशिक्षण व प्रशिक्षणोत्तर मुल्यमापन, प्रमाणिकरण, रोजगारोपरांत अशा अनेक बाबंीचे सनियंत्रण होणार आहे. हे पोर्टल नोंदणीकृत प्रशिक्षित उमदेवारांसाठी आजीवन करियर व्यवस्थापनाचे व्यसपीठ म्हणून भूमिका बजावेल.
राष्ट्रीय कौशल्य विकासासाठी रोजगाराची अधिकत्मक संधी असलेल्या 11 क्षेत्रांची निवड करण्यात आली असून यामध्ये बांधकाम, उत्पादन व निर्माण, वस्त्रोद्योग, ऍ़टोमोटीव्ह, आतिथ्य, आरोग्य देखभाल, बॅकिंग, वित्त सेवा व विमा, संघटित किरकोळ विक्री, औषधोत्पादन व रसायने, माहिती तंत्रज्ञान व सलंग्न आणि कृषी प्रक्रिया या क्षेत्रांचा समावेश आहे. प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाद्वारे प्रतीवर्षी सुमारे 45 लाख मनुष्यबळाचे कौशल्य विकास साधण्याचा प्रयत्न आहे. यंदा
या अभियानातून 5 लाख मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करुन त्यांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचे महत्वकांक्षी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अभियान गमिमान
प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान कोल्हापूर जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून यासाठी जिल्ह्यातील 70 संस्थांची निवड करुन त्यांच्यामार्फत यावर्षी 2291 विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रशिक्षणे देण्यात येत आहेत. कौशल्य
विकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये ब्युटी पार्लर, गारमेंट, सॉफ्ट किट, इलेक्ट्रीशन, हॉस्पिटॅलिटी, रिटेल, वॉर्डबॉय, नर्ससेस, जेम्स ज्वेलरी, संगणक टॅली प्रशिक्षण अशा विविध अभ्यास क्रमांचा समावेश असून ही कौशल्य विकासाची प्रशिक्षणे शासनामार्फत मान्यता देण्यात आलेल्या जवळपास 70 संस्थांमधून विनामुल्य देण्यात येत आहेत. या प्रशिक्षणाचा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी लाभ घेऊन रोजगार स्वंयरोजगाराच्या संधी प्राप्त कराव्यात, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक जी.ए.सांगडे यांनी केले आहे.
शासनाच्या विविध विभागात कौशल्य विकास प्रशिक्षणासी निगडीत सर्व योजनांची सांगड घालून 15 ते 45 वयोगटातील उमदेवारांची मागणी असलेल्या क्षेत्रानुसार कौशल्य वर्धन करुन त्यांना रोजगारक्षम बनविण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. प्रमोद
महाजन कौशल्य विकास अभियानांतर्गत विविध व्यवसायांचे किमान एक महिन्यापासून 6 ते 7 महिन्यापर्यंत कालावधीची प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जात असून यासाठी कौशल्य विभागामार्फत मान्यता दिलेल्या कोल्हापूर जिल्हयातील 70 संस्थामार्फत कोशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या
अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यास 2600 उमेदवारांना कौशल्य विकासाद्वारे रोजगार स्वंयरोजगारासाठी सक्षम करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा विभाग कार्यरत आहे. याबरोबरच कौशल्य विकास अभियनांतर्गत जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात विविध ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करुन जवळपास 900 उमेदवारांना विविध
उद्योग घटकामध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
एकंदरीत बाजारपेठेतील मागणी असलेल्या क्षेत्रांच्या गरजेनुसार 15 ते 45 वयोगाटातील मनुष्यबळाला कौशल्य विकासातून रोजगारक्षम बनवून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणारे प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान खऱ्या अर्थाने तरुणांना नवी दिशा देणारे असेच आहे.
एस.आर.माने
माहिती
अधिकारी,कोल्हापूर
000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.