कोल्हापूर, दि. 12 : पुढील वीस वर्षाचा कोल्हापूरचा विकास दृष्टीक्षेपात ठेवून कोल्हापूर प्रादेशिक आराखडा तयार करण्यात येत आहे. या अनुषंगाने दळणवळण, प्रादेशिक उद्यान, नागरी संकुले, औद्योगिक विकासाच्या दृष्टीने प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्र याबाबींवर विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, आ. सुरेश हाळवणकर, आ. चंद्रदीप नरके, महापौर अश्विनी रामाणे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, ज्येष्ठ
विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, नगर
रचना विभागाचे पुणे येथील सहसंचालक प्र. ग. भुग्ते,
पन्हाळा नगराध्यक्ष असिफ मोकाशी,
इचलकरंजीच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरांजे,
गडहिंग्लजचे नगराध्यक्ष राजेश बोरगावे,
मुख्य वनसंरक्षक एम.के.राव, जलसंपदाचे
अधीक्षक अभियंता सुधीर साळुंखे,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.एस.साळुंखे,
उपवन संरक्षक रंगनाथ नाईकडे,
नगररचना विभागाचे उपसंचालक मो. र. खान,
चेंबर ऑफ कॉमर्सचे अनंत माने, विनायक
रेवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोल्हापूर
प्रदेशच्या पुढील 20
वर्षांच्या विकासाचा साकल्याने विचार करुन विविध आठ अभ्यास गटांनी सादर केलेल्या अहवालांवर चर्चा करण्यात आली. सन 1978
ला कोल्हापूर इचलकरंजी असा पहिला प्रादेशिक आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये कोल्हापूर, जयसिंगपूर,
इचलकरंजी या संकुलांचा समावेश होता. 23 फेब्रुवारी 2011
ला कोल्हापूर प्रादेशिक नियोजन मंडळ गठीत करण्यात आले. सदर मंडळासमोर हा आराखडा आज सादर करण्यात आला. यामध्ये सन 2036
साली कोल्हापूर प्रदेशाची प्रस्तावित लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून दळणवळण,
प्रादेशिक उद्यान,
औद्योगिक विकासासाठी नवीन प्रस्तावित एमआयडीसी क्षेत्र,
लोकसंख्या वाढीच्या दृष्टीने नागरी संकुलांचा विकास,
ब्ल्यू लाईन,
रेड लाईन सर्व्हे या महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
वाहतूक, परिवहन व दळणवळण या विषयामध्ये कोल्हापूर विमानतळ परिसरातील बफर झोन आणि टनेल यांची माहिती देण्यात आली,
तर कोल्हापूर जिल्ह्यात 2
रेल्वे लाईन प्रस्तावित असून कराड-बेळगाव आणि कोल्हापूर-वैभववाडी (110
कि.मी.) यांचा समावेश आहे. नॅशनल हायवेचेही रुंदीकरण प्रस्तावित असून यामध्ये 10
मीटरच्या दोन्ही बाजूंच्या सर्व्हीस रोडचा समावेश असून हे सर्व्हीस रोड किमान 47
कि.मीटरचे होतील. कोल्हापूर शहराला 86
कि.मी.चार रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला असून विशेषबाब म्हणून इचलकंरजीलाही बायपास रस्ता प्रस्तावित करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला.
पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी प्रादेशिक उद्यान आवश्यक असून एमआरसॅक (MRSAC)
च्या माध्यमातून सॅटेलाईट इमेजवरुन नकाशे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये प्रादेशिक आराखडयामध्ये 19:5
पेक्षा जास्त
चढ-उतार असलेल्या जमिनींवर प्रादेशिक उद्यान प्रस्तावित करण्यात आले आहे.
औद्योगिक
विकास ही महत्वाचा असून त्या दृष्टीने जिल्ह्यात सध्या 6
एमआयडीसी क्षेत्रे आहेत. आणखी 5
ठिकाणी नव्याने एमआयडीसी क्षेत्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. नागरी विकास ज्या ठिकाणी वेगाने आहे अशा 14
ठिकाणांचा सुक्ष्म विकास आराखडा तयार करण्यात आला असून सर्व्हे नंबर निहाय यलो झोन (Yellow
Zone)
निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर,
इचलकरंजी, जयसिंगपूर,
कागल आणि गडहिंग्लज या ठिकाणी नागरी संकुल प्रस्तावित करण्यात आले आहे. तर हुपरी, कोडोली,
हातकणंगले याठिकाणी ग्रामीण विकास संकुले प्रस्तावित करण्यात आली आहे. शाहूवाडी,
गगनबावडा ,
गारगोटी,आजरा, राधानगरी,
चंदगड याठिकाणी नगरी विकास केंद्रे, बांबवडे,
कुंबोज, भादोले,
आब्दुललाट, दानोळी,
उत्तुर या ठिकाणी नागरी विकास केंद्रे प्रस्तावित आहेत. 5
हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गावठाणपासून 750
मीटर तर 5
हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावठाणांनपासून 1500
मीटर आणि इकोसेन्सिटीव झोनपासून 200
मीटर निवासी घरांसाठी मान्यता प्रस्तावित करण्यात आली आहे. जलसंपदा विभागामार्फत ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन निश्चित करण्याचे काम सुरु असून येत्या 4
महिन्यात हा सर्व्हे पूर्ण होईल असेही यावेळी सांगण्यात आले.
कोल्हापूर प्रादेशिक आराखडा बनविण्याची मुदत येत्या 22
सप्टेंबरला संपत असून आराखडा हरकती व सूचनांसाठी प्रसिध्द करण्यात आल्यानंतरही यामध्ये एखादी बाब वगळणे अथवा समाविष्ठ करणे याची मुभा राहील असेही यावेळी सांगण्यात आले.
0 0 0
0
0
0
0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.