बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

पर्यावरण पूरक आणि डॉल्बीमुक्त गणेश मंडळांना पालकमंत्री पाटील यांच्याकडून लोकमान्यांची प्रतिमा भेट





कोल्हापूर दि. 14 :- पर्यावरण पूरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करणा-या शहर जिल्हयातील गणेश मंडळांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले असून अशा जवळपास शंभरहून अधिक गणेश मंडळांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे उद्गाते  लोकमान्य टिळकांची प्रतिमा भेट देऊन मंडळांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले आहे.
            यंदा जिल्हयात पर्यावरण पूरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हयातील सर्वच गणेश मंडळांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सर्व मंडळानी सामाजिक उत्तरदायित्व जोपासल्याबदल धन्यवाद देऊन यापुढील काळातही मंडळांनी सामाजिक विषय डोळयासमोर ठेऊन कोल्हापूर शहराबरोबरच जिल्हयातील विविध सामाजिक प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी सक्रीय व्हावे, असे आवाहनही केले आहे.
            पर्यावरण पूरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात पुढाकार घेतल्याबदल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावतीने काल प्रातिनिधीक स्वरुपात येथील श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाच्या गणेशोत्सवास सामाजिक कार्यकर्ते राहुल चिक्कोडे यांच्याहस्ते मंडळाचे अध्यक्ष अजित सासणे यांना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची प्रतिमा भेट दिली. यावेळी जिल्हा अग्रणी बॅक अधिकारी एम.जी.कुलकर्णी, माहिती अधिकारी एस.आर.माने यांच्यासह मंडळाचे मान्यवर पदाधिकारी आणि सभासद तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
            यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल चिक्कोडे म्हणाले, गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक सोहळा असून या सोहळयास लोकमान्य टिळक यांच्यामुळे सामाजिक महत्व प्राप्त झाले. लोकमान्य टिकळांनी समाज जागृती आणि प्रबोधनाच्या भूमीकेतून सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आजही मोठया उत्साहाने आणि लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असा  साजरा करण्यात कोल्हापूर जिल्हयातील गणेश मंडळांनी फार मोठी भूमीका बजावली आहे. गणेशोत्सवात सामाजिक जाणीव जागृती, प्रबोधनाची श्रेष्ठ परंपरा यापुढेही कायम ठेवुन पर्यावरण पूरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात मंडळानी सातत्य ठेवण्याचे आवाहनही त्यनी केले.
            कोल्हापूर जिल्हयातील गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात विशाल सामाजिक दृष्टीकोन डोळयासमोर ठेवून विविध सामाजिक उपक्रमाबरोबरच जल आणि वायू प्रदुषण रोखण्यासाठी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यात घेतलेला पुढाकार लाख मोलाचा आहे. गणेशोत्सवाला लाभलेली सामाजिक जाणीव जागृतीची आणि प्रबोधनाची श्रेष्ठ परंपरा पुढे नेण्याचे काम राज्य शासनाच्या माहिती जनसंपर्क विभागाने संवादपर्व या उपक्रमातून यंदा सुरु केल्याबद्‌दल सामाजिक कार्यकर्ते राहुल चिक्कोडे यांनी कोतुक केले. या उपक्रमामुळे शासनाच्या नवनव्या योजना आणि उपक्रम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होत आहे. यापुढेही असे विविध उपक्रम माहिती जनसंपर्क विभागाने हाती घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
            श्री छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाचे अध्यक्ष अजित सासणे यांनी स्वागत करुन शासनाच्या संवादपर्व कार्यक्रमाचे कौतुक केले.यावेळी मंडळाचे मान्यवर पदाधिकारी, गणेशभक्त आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.