कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनची मुदत दि. 31 मार्च
रोजी रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी
दिले.
यापूर्वी प्रतिबंधीत/बंद क्षेत्र व
सुट/वगळण्यात आलेली क्षेत्र कायम ठेवण्यात येत आहेत. यापूर्वी वेळोवळी परवानगी दिलेल्या
बाबी/क्षेत्र पुर्ववत सुरु राहतील.
आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा
संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम
2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल,
असेही आदेशात नमुद आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.