गुरुवार, १८ मार्च, २०२१

प्रलंबित प्रकरणांमधील अर्जदारांनी त्रुटींची पूर्तता करून लाभ घेण्याचे आवाहन

 

 

कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) : सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी विशेष मोहीम राबवायची आहे. या मोहिमेंतर्गत ज्या अर्जदारांनी या समितीकडे अर्ज सादर करून सहा महिने किंवा सहा महिन्यापेंक्षा जास्त कालावधी झालेला आहे व त्रुटी पुर्ततेअभावी प्रलंबित आहे अशा अर्जदारांनी दि. 15 ते 30 मार्च या कालावधीत त्रुटी पुर्तता करून विशेष लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी सचिन  साळे यांनी केले आहे.

त्रुटी पुर्तता न झाल्यास अपुरे पुरावे असलेली प्रकरणे जाती प्रमाणपत्र पडताळणी नियमावलीमधील कलम 17 (2) व 17 (3) अन्वये निकाली काढण्यात येतील याची नोंद घ्यावी.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.