कोल्हापूर, दि. 9 (जिल्हा माहिती कार्यालय): विभागीय वन अधिकारी विशाल माळी
यांनी यावर्षी पर्यावरणपूरक दिनदर्शिका बनवून तिच्यात लपलेल्या बियांमधून
वृक्षारोपणाची कार्यसिध्दी साधली आहे.
कार्यालयातील मेजावर ठेवण्यात येणारी ही दिनदर्शिका हाताने बनवलेल्या
कागदापासून तयार करण्यात आली आहे. एका पानावर तीन महिने अशा पध्दतीने वर्षाची
दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. इंधन वाचवा, पाणी वाचवा, वीज वाचवा आणि सेंद्रिय
खत निर्मिती करा, असा पर्यावरण संदेशही संदेश देण्यात आला आहे. या प्रत्येक
पानामध्ये कॉक्सकॉम्ब आणि ॲस्टर, झेंडू, मिरची, बॅसिल या बियांचा समावेश करण्यात
आला आहे.
प्रत्येक
पानावर त्या बियांची माहिती देण्यात आली आहे. दिनदर्शिकेच्या मागील बाजूला
त्याबाबत सूचना देण्यात आली आहे. महिने संपल्यानंतर संबंधित महिन्याचे पान हे
मातीमध्ये घालून त्याला पाणी दिल्यास त्यापासून संबंधित बियांचे रोपात रूपांतर
होणार आहे. विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांनी या पर्यावरणपूरक दिनदर्शिकेमधून
वन खात्याच्या वृक्षारोपण करा आणि पर्यावरण वाचवा हा संदेशाची पूर्ती करण्याचा
प्रयत्न साधला आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.