कोल्हापूर,
दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोविड -19 च्या
प्रार्दुभावाच्या पार्श्वभूमीवर यात्रा,
उत्सव, उरुस इ. चे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. "होळी/शिमगा,
धुलिवंदन व रंगपंचमी" चा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, अशा सूचना
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या आहेत.
१)
होळी/शिमगा हा सण संपूर्ण
महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दि. 28 मार्च रोजी होळीचा सण आहे. कोविड-19 चा
वाढता प्रादुर्भाव पाहता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगच्या
नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा.
२)
दि. 29 मार्च रोजी धूलिवंदन व 2
एप्रिल रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. दरवर्षी या सणानिमित्ताने
एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत
असते. परंतू कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धूलिवंदन व रंगपंचमी हे सण
साधेपणाने साजरे करावेत. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जनजागृती
करणे आवश्यक आहे.
३)
होळी/शिमगा व धूलिवंदन या
उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू
नयेत.
४)
कोविड-19 च्या विषाणूंचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय
शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी
विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष
सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे
देखील अनुपालन करावे.
"होळी/शिमगा, धूलिवंदन व
रंगपंचमी" हे सण / उत्सव साजरा करतेवेळी सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत आपले अधिनस्त सर्व
संबंधितांना आपल्या स्तरावरुन सूचना देण्यात याव्यात. अशा सूचनाही जिल्हाधिकारी
श्री. देसाई यांनी दिल्या आहेत.
00 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.