कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय)
: जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत विविध
क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या मार्गदर्शनासाठी आयोजित करण्यात आलेला ऑनलाईन जिल्हास्तरीय
महिला दिन सप्ताह संपन्न झाला.
या
सप्ताहात व्याख्यात्यांचे त्यांच्या यशस्वी वाटचालीमधील आलेले अनुभव, महिलांना
भेडसावणाऱ्या विविध समस्या, सध्याच्या काळात महिलांना शारिरीक, मानसिक, भावनिक,
बौध्दिक, आर्थिक,सामाजिक व राजकीयदृष्ट्या सक्षम असणे किती अनिवार्य आहे याबाबत सहभागी
महिलांना संबोधित केले. किशोरवयीन मुले-मुली
आपल्या भविष्याचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आजच्या
तंत्रज्ञानाच्या दुनियेतून स्वत:ला सुरक्षित ठेवून उज्वल यश कसे संपादित करावे,
याबाबत आम्रपाली रोहिदास यांनी मार्गदर्शन केले.
डॉ.
पाटील यांनी समाजातील सर्व महिलांनी सक्षम होण्यासाठी सामाजिक, मानसिक, आर्थिक,
आरोग्यविषयक व राजकीय आयाम कोणकोणते आहेत या मार्गामध्ये स्त्रीया कशा सक्षम होऊ
शकतात याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. शिंदे यांनी प्रत्येक
कुटूंबाच्या उत्कर्षासाठी कुटूंबातील महिलेचे आरोग्य खूपच महत्वाचे असते. मुलीचे
बालपण, किशोर वयात पाळी येणे, तारूण्यावस्था, मेनोपॉज अवस्था व पन्नाशीनंतरची
स्त्रीची अवस्था या प्रत्येक टप्प्यावर मुलीने व स्त्रीने काय काळजी घ्यावी. आहार,
विहार, व्यायाम कसा असावा, पाळीबाबतचे समज-गैरसमज या बाबतीत मार्गदर्शन केले.
महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरेही त्यांनी दिली.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण
गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देशाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी किती महत्वाचे आहे,
यावर कांचनताई परूळेकर यांनी अनेक उदाहरणांच्या, अनुभवांच्या सहाय्याने प्रकाशझोत
टाकला. शिक्षणाची सप्तपदी, भारताची महासत्तेकडे वाटचाल, कौशल्य आधारित शिक्षण
पध्दती, उद्योग शिक्षण, नापासांची शाळा, शेती क्षेत्रातील आयाम, अनौपचारिक
शिक्षणाचे विद्यापीठ इत्यादी अनेक वेगवेगळ्या संकल्पना समर्पकपणे मांडल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.
आय.सी.शेख, संयोजक डॉ. अंजली रसाळ, जिल्हा समुपदेशक श्रीम. सरला पाटील, विषयक
सहाय्यक श्रीम. निशा काजवे व श्रीम. शुभांगी मेथे-पाटील यांनी केले. जे या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले
नाहीत त्यांना हा कार्यक्रम डायेट कोल्हापूर या यु-ट्यूब चॅनेलवर पाहण्याची संधी
उपलब्ध करून देण्यात आली आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. शेख यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.