गुरुवार, ४ मार्च, २०२१

वयोश्रेष्ठü सन्मान पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन


कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय): 1 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणा-या एकात्मिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वयोवृध्दांसाठी काम करणा-या व्यक्ती /संस्थाना विविध प्रवर्गातील वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. संबधीत क्षेत्रात काम करणा-या व्यक्ती व संस्था यांच्याकडून विहीत नमुन्यात पात्र व्यक्ती / संस्था यांचे प्रस्ताव इंग्रजीमध्ये टंकलिखीत करुन (सॉप्ट कॉपीसह) तीन प्रतीमध्ये समाज कल्याण कार्यालयास 10 मार्च रोजी सांय 6.00 वा पर्यंत सादर करण्याचे अवाहन सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी आयुक्त, समाज कल्याण विभाग, सामाजिक न्याय भवन विचारे माळ, कावळा नाका, कोल्हापूर फोन-0231-2651318 येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

0000

 

 

                                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.