कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय)
: वस्तू व सेवा कर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण
करावे, अशी सूचना वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिली.
शासकीय विश्रामगृहात आज त्यांनी आढावा बैठक घेतली. राज्य उत्पादन शुल्क
विभागाचे उपायुक्त यशवंत पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, महाराष्ट्र राज्य
कृषी पणन मंडळाचे उप महाव्यवस्थापक सुभाष घुले, जिल्हा कोषागार अधिकारी महेश
कारंडे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक संजय माळी आदी उपस्थित होते.
वित्त व नियोजन राज्यमंत्री श्री. देसाई
यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेला
निधी समर्पित होणार नाही. तो खर्च होईल याबाबत दक्षता घ्यावी. विभागांना दिलेले
उद्दिष्ट्य पूर्ण होईल याबाबतही नियोजन करावे. कौशल्य विकास विभागाने ऑनलाईन
प्रशिक्षण घेण्याबाबत संस्थांना सूचना द्यावी. शीतगृह उभारणी आणि तालुकास्तरावर
बाजार समिती निर्माण करण्याबाबत प्रयत्न केला जाईल. त्यासाठी पालकमंत्र्यांशी
लवकरच चर्चा करू.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.