कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय): येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आजही
विविध अधिकारी-कर्मचारी यांनी स्वच्छता मोहीम राबवून अवघ्या अर्ध्या तासात परिसर
स्वच्छ केला.
आजच्या या मोहिमेत स्वच्छतादूत आमित कुलकर्णी,
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जिल्हा माहिती कार्यालय, मुद्रांक कार्यालय,
राधानगरी प्रांत कार्यालय, ग्राहक न्यायालय, विभागीय माहिती कार्यालय, तहसिलदार
कार्यालय संजय गांधी कार्यालय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, शहर
पुरवठा कार्यालय आदी कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.