कोल्हापूर,
दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, कळंबा येथे स्ट्राईव्ह प्रोजेक्ट (Strive Project) योजनेअंतर्गत विविध
व्यवसायातील अल्पमुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यात
येणार आहेत. त्यापैकी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम दि. 10 मार्च पासून सुरु होत असून इच्छुक उमेदवारांनी त्वरीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
कळंबा येथे 11 ते 5 या वेळेत संपर्क
साधावा, असे आवाहन संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
संस्थेतील आधुनिक यंत्रसामुग्रीवर संस्थेतील तज्ञ व्यवसाय निदेशकांकडून मोफत प्रशिक्षण
देण्यात येणार आहे.
सीएनसी प्रोग्रॅमरसाठी शैक्षणिक अर्हता डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, एनएसक्युएफ
लेवल 4, किमान वयोमर्यादा 18 वर्षे प्रशिक्षण कालावधी (तासामध्ये) 450 व प्रवेश
क्षमता 30 राहील.
डिझायनर मेकॅनिकलसाठी शैक्षणिक अर्हता डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, एनएसक्युएफ
लेवल 5, किमान वयोमर्यादा 18 वर्षे प्रशिक्षण कालावधी (तासामध्ये) 400 व प्रवेश
क्षमता 30 राहील.
सीएनसी ऑपरेटिंग टर्निंगसाठी शैक्षणिक अर्हता 10 वी पास, एनएसक्युएफ लेवल 3, किमान
वयोमर्यादा 18 वर्षे प्रशिक्षण कालावधी (तासामध्ये) 400 व प्रवेश क्षमता 60 राहील.
लेथ ऑपरेटरसाठी शैक्षणिक अर्हता 8 वी पास, एनएसक्युएफ लेवल 4, किमान वयोमर्यादा
18 वर्षे प्रशिक्षण कालावधी (तासामध्ये) 400 व प्रवेश क्षमता 60 राहील.
ऑटोमोटिव्ह पेंटिंग टेक्निशियनसाठी शैक्षणिक अर्हता आयटीआय पेंटिंग टेक. 12वी पास,
एनएसक्युएफ
लेवल 4, किमान वयोमर्यादा 15 वर्षे प्रशिक्षण कालावधी (तासामध्ये) 400 व प्रवेश
क्षमता 30 राहील.
रिपेअर वेल्डरसाठी शैक्षणिक अर्हता आयटीआय वेल्डर/ एमएमव्ही/ डीएलएम डिप्लोमा,
एनएसक्युएफ
लेवल 4, किमान वयोमर्यादा 18 वर्षे प्रशिक्षण कालावधी (तासामध्ये) 400 व प्रवेश
क्षमता 30 राहील.
असेंब्ली ऑपरेटर-रॅकसाठी शैक्षणिक अर्हता 10 वी पास, एनएसक्युएफ लेवल 4, किमान
वयोमर्यादा 18 वर्षे प्रशिक्षण कालावधी (तासामध्ये) 360 व प्रवेश क्षमता 30 राहील.
फिल्ड टेक्निशियन एसीसाठी शैक्षणिक अर्हता 8 वी पास/आयटीआय/डिप्लोमा,एनएसक्युएफ लेवल 4,
किमान वयोमर्यादा 18 वर्षे प्रशिक्षण कालावधी (तासामध्ये) 300 व प्रवेश क्षमता 30
राहील.
गॅस टंगस्टन एआरसी वेल्डिंगसाठी शैक्षणिक अर्हता 10 वी पास आयटीआय पास,एनएसक्युएफ लेवल 4, किमान
वयोमर्यादा 18 वर्षे प्रशिक्षण कालावधी (तासामध्ये) 380 व प्रवेश क्षमता 30 राहील.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.