कोल्हापूर,
दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यात
कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सिनेमागृहे ( सिंगल
स्क्रिन आणि मल्टिप्लेक्सेस), हॉटेल्स / रेस्ट्राँरंटस 50 टक्के क्षमतेच्या अधिन राहून सुरू
ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या
आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व सिनेमागृहे ( सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्सेस),
हॉटेल्स / रेस्ट्राँरंटस 50 टक्के
क्षमतेच्या अधिन राहून सुरु ठेवण्यासाठी खालील प्रमाणे मार्गदर्शन सूचना जारी
केल्या आहेत.
अ) सर्व
सिनेमागृहे ( सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्सेस), हॉटेल्स / रेस्ट्राँरंटस ही
खालील प्रतिबंधास अधिन राहून 50 %
क्षमतेच्या अधिन राहून सुरू राहतील.
I) |
मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला
जाणार नाही . (No Mask – No Entry) |
II) |
सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या
तापमानाची नोंद घेणेत यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश
दिला जाणार नाही. |
III) |
प्रवेशव्दार
तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड सॅनिटायझर ठेवणेत यावीत. |
IV) |
सर्व आस्थापनांच्या मध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ
नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल, सामाजिक
अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल. |
आदेशाचा
भंग केल्यास, संबंधित सिनेमागृहे ( सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्सेस), हॉटेल्स /
रेस्ट्राँरंटस ही कोव्हीड -19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून
अधिसूचित केले असे तोपर्यत बंद राहतील. तसेच संबंधित आस्थापना मालक हे आपत्ती
व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील.
ब) सर्व
शाँपीग मॉल्स यांना खालील नमूद प्रतिबंधाचे पालन करणे बंधनकारक असेल.
I) |
मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला
जाणार नाही . (No Mask – No Entry) |
II) |
सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या
तापमानाची नोंद घेणेत यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश
दिला जाणार नाही. |
III) |
प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड
सॅनिटायझर ठेवणेत यावीत. |
IV) |
सर्व आस्थापनांच्या मध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ
नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल, सामाजिक
अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल. |
V) |
सर्व मॉल्सचे व्यवस्थापक यांनी संबंधित मॉल्समध्ये
असलेले थियटर्स, रेस्टाँरंटस किंवा इतर कार्यरत आस्थापना यामध्येही घालणेत
आलेल्या प्रतिबंधाचे सदर आस्थापना सुरू करणेपूर्वी तसेच सुरू असताना पालन करत
आहेत याबाबत दक्षता घेणे. |
सदर आदेशाचा भंग केल्यास,
संबंधित शॉपिग मॉल्स ही कोव्हीड -19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून
अधिसूचित केले असे तोपर्यत बंद राहतील. तसेच संबंधित आस्थापना मालक हे आपत्ती
व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील.
क)
कोणतेही
सामाजिक / सांस्कृतिक / राजकीय / धार्मिक कार्यक्रम, सभा, मोर्चे, मिरवणूका,
संमेलने तसेच यात्रा, उत्सव, उरुस इ.चे आयोजन करणेस परवानगी असणार नाही. सदर
आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यक्रमाचे आयोजक/ जागा मालक हे आपत्ती व्यवस्थापन
कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहतील. तसेच संबंधित
सभागृहे / इतर ठिकाणे ही कोव्हीड -19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून
अधिसूचित केले असे तोपर्यत बंद केली जातील.
ड)
विवाह समारंभ कार्यक्रमास फक्त 50 नागरिकांना उपस्थित राहणेस परवानगी असेल. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यक्रमाचे
ठिकाण / हॉल मालक हे आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दंड वसूल करणेस तसेच
फौजदारी कारवाईस पात्र राहतील. तसेच संबंधित ठिकाणे / हॉल ही कोव्हीड -19 विषाणु
संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून अधिसूचित केले असे तोपर्यत बंद केली जातील.
इ)
अंतविधी / अंत्ययात्रा इत्यादी कार्यक्रमामध्ये सहभागी होणेस फक्त 20 नागरिकांना
परवानगी असेल. स्थानिक प्राधिकरण यांनी या अटीचे पालन केले जात असलेबाबत खात्री
करणे.
ई)
स्थानिक आठवडी बाजार (जनावरांच्या बाजारासह) सुरू राहणेस परवानगी देणेत आलेली आहे.
सदर आठवडी बाजाराबाबत स्थानिक ग्रामिण व नागरी प्रशासन कोव्हीड -19 प्रतिबंधात्मक
उपाययोजनांच्या अनुषंगाने योग्यत्या मार्गदर्शक सुचना निर्गमित करणेबाबत व
कोविड-19 बाबतचा शिष्टाचार काटेकोर पणे पाळणेबाबत आदेश निर्गमित करणेत आलेले आहेत.
सदर निर्देशांचे काटेकोरपणे पालन केले जात असलेबाबतची खातरजमा संबंधीत स्थानिक
स्वराज्य संस्था व पोलीस प्रशासन यांनी करुन उल्लंघन करणाऱ्या आयोजक / आस्थापना
यांचेवर दंडात्मक / फौजदारी कारवाई करणेत
यावी.
फ)
शाळा, कॉलेजीस, कोचींग क्लासेसच्या ठिकाणी मास्क तसेच विद्यार्थ्यांमध्ये सोशल
डिस्टन्स ठेवणे यांची जबाबदारी संबंधित शाळा, कॉलेजीस, कोचींग क्लासेसचे
प्रमुखांनी घ्यावयाची आहे. या अटीचे पालन न झाल्यास संबंधीत संस्था प्रमुख /
व्यवस्थापक दंडनिय व फौजदारी कारवाईस पात्र राहतील.
ग)
कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील पर्यटन स्थळे, सर्व ऐतिहासिक
वास्तू, दुर्ग, स्मारके, संग्रहालये इ. साठी कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक
सुचनांचे काटेकोरपणे पालन करणेच्या अटी व शर्तीसह पर्यटक / नागरिकांसाठी खुले
करणेस परवानगी देणेत आलेली आहे. सदर ठिकाणी मास्क नाही तर प्रवेश नाही व आवश्यक
सामाजिक अंतर बाळगणे, हात निर्जंतुकीकरण करणे बंधन कारक आहे. या अटीचे पालन न
झाल्यास संबंधीत व्यक्ती दंडनिय व फौजदारी कारवाईस पात्र राहतील.
घ)
सर्व खाजगी व्यापारी आस्थापनांनी, शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी दर्शनी भागावर
मास्क नाही, प्रवेश नाही, मास्क नाही वस्तु / सेवा वितरण नाही इ. फलक लावावेत व
त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनां
दंडनिय व फौजदारी कारवाईस पात्र राहतील.
द)
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, दुचाकी, ऑटो रिक्क्षा, खाजगी प्रवासी बसेस यामधून
प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सक्तीने मास्कचा वापर करणे बंधनकारक करणेत आलेले आहे.
अटीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व व्यवस्थापक दंडनिय व फौजदारी कारवाईस पात्र
राहतील.
ध)
गृह अलगीकरणास खालील प्रतिबंधास अधिन राहून परवानगी असेल.
I) |
गृह
अलगिकरण झालेल्या नागरिक / रुग्णांविषयीची माहिती संबंधित स्थानिक प्राधिकरण
यांना कळविणे. तसेच तसेच गृह अलगीकरण व्यक्ती ही कोणत्याही वैद्यकीय
व्यावसायिकाच्या (डॉक्टर ) यांचे देखरेखीखाली आहे याची देखील माहिती स्थानिक
प्रशासनास देणे बंधनकारक असेल. |
II) |
कोव्हीड
-19 रुग्ण असलेल्या ठिकाणी सुरवातीच्या दिवसापासून 14 दिवसापर्यत दर्शनी ठिकाणी
फलक लावावा लागेल, जेणेकरून त्या ठिकाणी कोव्हीड -19 रुग्ण असलेची माहिती
नागरिकांना होईल. |
III) |
कोव्हीड
-19 + Ve रुग्णांच्या हातावर गृह अलगीकरण (Home Quarantine) असा शिक्का मारणे. |
IV) |
सदर
कोव्हीड -19 रुग्ण गृह अलगीकरण केलेल्या ठिकाणी संबंधित कुटुंबातील व्यक्तीनीही
कमीत कमी संपर्क ठेवावा. तसेच मास्क परिधान केलेशिवाय सदर ठिकाणी प्रवेश केला
जाणार नाही, याविषयी दक्षता घेणेत यावी. |
V) |
गृह अलगीकरणाची कोणत्याही प्रकारचे उल्लंघन झालेस
सदर कोव्हीड -19 रुंग्ण किंवा अलगीकरण झालेले नागरिक यांना स्थानिक प्रशासनाने
सुरु केलेल्या कोव्हीड केअर सेंटरमध्ये (CCC) मध्ये स्थंलातरीत केले जाईल. |
न)
सर्व कार्यालये / आस्थापना ( आरोग्य
व इतर अत्यावश्यक असलेल्या आस्थापना वगळता) ही 50 % क्षमतेच्या अधिन राहून सुरू
राहतील. घरातून काम (Work from home)
करणेबाबत प्रोत्साहित करणे. सदर आदेशाचा भंग केल्यास, संबंधित कार्यालय /
आस्थापना व्यवस्थापना ही कोव्हीड -19 विषाणु संसर्ग केंद्र सरकारने आपत्ती म्हणून
अधिसूचित केले असे तोपर्यत बंद राहतील. सर्व धार्मिक ठिकाणच्या व्यवस्थापन
करणाऱ्या विश्वस्त यांनी संबंधित धार्मिक ठिकाणच्या परिसरामध्ये उपलब्ध असणारी
जागा आणि पुरेशे सामाजिक अंतर राखले
जाणेच्या दुष्टीकोनातून ताशी किती अभ्यांगताना प्रवेश देणेत येईल या संख्येची
निश्चिती करून प्रसिध्द करणे. भाविक तसेच
अभ्यागंतासाठी ऑनलाईन आरक्षण किंवा इतर सोयीच्या पध्दतींचा वापर करणे. वरील ठिकाणी
फक्त खालील प्रतिबंधास अनुसरून प्रवेश दिली जाईल याबाबत दक्षता घेणे.
I) |
मास्क परिधान केल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला
जाणार नाही . (NO Mask – No Entry) |
II) |
सर्व ठिकाणी तापमापीचा उपयोग करून शरीराच्या
तापमानाची नोंद घेणेत यावी, जेणेकरून ताप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश
दिला जाणार नाही. |
III) |
प्रवेशव्दार तसेच इतर ठिकाणी पुरेशा प्रमाणात हँड
सॅनिटायझर ठेवणेत यावीत. |
IV) |
सर्व आस्थापनांच्या मध्ये पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ
नियुक्त करावे, जेणेकरून सर्व अभ्यांगताबाबत मास्क परिधान केला जाईल, सामाजिक
अंतर राखले जाईल याविषयी तपासणी केली जाईल. |
यापूर्वी वेळोवेळी परवानगी दिलेल्या व प्रतिबंधित
केलेल्या बाबी / क्षेत्रे कायम राहतील आणि यापूर्वी दिलेले आदेश सदर आदेशास संलग्न
राहतील आणि सदरचे आदेश दिनांक 31/03/2021
पर्यंत लागू राहतील.
आदेशाचे पालन न करणाऱ्या
कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45)
याच्या कलम 188,
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे
फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.