सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या योजना

 

 

कोल्हापूर दि. 22 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी  शिष्यवृत्तीची  योजना या वर्षी ऑफलाईन पध्दतीने राबवण्यात येणार आहे, अशी माहिती  जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी दिली आहे.

 शिष्यवृत्तीच्या योजना  खालीलप्रमाणे -

      मॅट्रिकपूर्व  शिष्यवृत्ती – विजाभज, इ.मा.व व  अनु. जातीसाठी  इयत्ता 1 ली ते 10 वी साठी,  १ ली ते १० वी बँक पासबुक छायांकित प्रत, पालकांचा सन 2020-21 चा पालकांचा उत्पन्नाचा दाखला (अनु जाती व विजाभजसाठी  रु. २ लाख व इमावसाठी २ लाख रु.)

    सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (फक्त मुली)- इमाव, विजाभज, विमाप्र, अनु जाती, इ. 5 वी ते 7 वी व 8 वी  ते 10 वी, बँक पासबुकची छायांकित प्रत.

१० परीक्षा फी- अनु. जाती, विजाभज, विमाप्र, इ. 10 वी, बँक पासबुक छायांकित प्रत

गुणवत्ता शिष्यवृत्ती- अनु. जाती, विजाभज, विमाप्र, 5 वी ते 7 वी व इ. 8 वी ते 10 वी, बँक पासबुक छायांकित प्रत व मागील परीक्षेचे गुणपत्रक

अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती- सर्व जाती/ धर्म, बँक पासबुक छायांकित प्रत, कातडी कमावणे सोलणे सफाईकाम कागद, काच, पत्रा गोळा करणे यापैकी  एक काम करत असल्याबाबत आयुक्त मुख्याधिकारी/ ग्रामसेवक यांचा दाखला. वसतीगृहात रहात असल्याबाबत वसतीगृह प्रमुखांचा दाखला इ.

         या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी सर्व शाळांनी विद्यार्थीनींचे प्रस्ताव आवश्यक त्या  माहितीसह जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर कार्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या तालुक्याच्या कॅम्पच्या ठिकाणी जमा करावेत, असे आवाहनही श्री. घाटे यांनी केले आहे.

0000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.