कोल्हापूर,
दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) : शेतकऱ्यांना पूरक
व्यवसाय उपलब्ध करुन देणे व शहरी पर्यटकांना शांत, निसर्गसंपन्न ठिकाणी राहून पर्यटनाचा
आनंद मिळावा यासाठी सुनियोजित व्यवस्था निर्माण करुन पर्यटन विकास साध्य करण्यासाठी
पर्यटन संचालनालयामार्फत जिल्ह्यात दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायं. 5 यावेळेत
सुखदेव शामराव गिरी, देवगिरी फार्म कृषी पर्यटन केंद्र, देवगिरी फार्म, घर नं.
188, करंजफेण, बांदिवडे रोड, ता. पन्हाळा येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात
आले असल्याचे पुणे येथील विभागीय पर्यटन कार्यालयाचे सहाय्यक संचालक सुप्रिया करमरकर
यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.