बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रीयांना धार्मिक व प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी प्रवेशास परवानगी

 

 

          कोल्हापूर, दि. 17 (जिमाका):  जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी कोविड-19 लसीचा दुसरा डोस घेवून 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रीयांना प्रवेशास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे.

या ठिकाणी मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि हँड वॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. यापूर्वी कोविड -19 व्यवस्थापनासाठी विहित केलेले शारिरिक अंतराचे व संसर्ग न पसरणेबाबत वेळोवेळी  देण्यात आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.