मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

शेतक-यांनी संयुक्त खताचा वापर करावा

 


कोल्हापूर, दि. 9 (जिमाका): रब्बी हंगामच्या पेरणीला सुरुवात झाली असून जिल्ह्यात २१५० मे.टन डी.ए.पी. शेतकऱ्यांना विक्री साठा कृषि सेवा केंद्रामध्ये उपलब्ध आहे. आवंटनानुसार डी.ए.पी. खत संबधीत उत्पादक कंपन्याकडून उपलब्ध करून घेण्यात येत आहे. संयुक्त खते जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी डी.ए.पी.खताचाच आग्रह न धरता गरजेनुसार त्याऐवजी संयुक्त खताचा वापर करावा तसेच शिफारशीनुसार पिकांसाठी अचूक खत मात्रा ठरविण्यासाठी व रासायनिक खत वापरात बचत करण्यासाठी कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्र, बारामती यांनी संयुक्तपणे विकसीत केलेल्या कृषिक अँपचा वापर करावा, असे आवाहन श्री. भिमाशंकर पाटील कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले आहे.

डी.ए.पी.खतास पर्यायी खत म्हणून १०:१०:२६,१२:३२:१६, २०:२०:०:१३ व १५:१५:१५ ही संयुक्त खते डी.ए.पी.खतास पर्यायी खते म्हणून वापरास कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शिफारस केली आहे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.