शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेची हस्तलिखित प्रतिमा जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट

 



 


कोल्हापूर, दि.26 (जिमाका): संविधान दिनाचे औचित्य साधून शाहीरविशारद डॉ.आझाद नायकवडी लोककला सामाजिक सांस्कृतिक फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला संविधानाच्या हस्तलिखित उद्देशिकेची फोटो प्रतिमा भेट देण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

        अपर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या कक्षामध्ये झालेल्या या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अश्विनी जिरंगे, फाउंडेशनचे मार्गदर्शक मदन पवार, फाऊंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष डॉ.आझाद नायकवडी, निवृत्त अधिकारी मदन पवार, डॉ.प्रविण कोडोलीकर, बंकट थोडगे, बाळासाहेब कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.