गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

राष्ट्रीय स्तरावरील पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन

 


कोल्हापूर दि. 25 (जिमाका) : एन. सी. सी. गट मुख्यालय कोल्हापूर साहसी उपक्रमांचा एक भाग म्हणून दि. 26 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय स्तरावरील पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करत आहे.

एन. सी. सी. ग्रुपचे कमांडर ब्रिगे‍डियर आणि त्यांचे अधिकारी पथक राष्ट्रीय स्तरावरील ट्रेकिंग शिबिराचे आयोजन करत असून हा ट्रेक 28,29,30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर या चार बॅचमध्ये पूर्ण होईल, अशी माहिती एन. सी. सी. ग्रुप हेडक्वार्टरचे ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल यांनी दिली.

शिवाजी पदभ्रमंती मोहिम (STT) या राष्ट्रीय स्तरावरील पदभ्रमंती शिबीरात मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, पाँडेचरी, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातून ट्रेकर्स सहभागी होणार आहेत.

00000

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.