इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

उचंगी प्रकल्पग्रस्तांचे अर्ज 3 डिसेंबर रोजी आजरा तहसिल कार्यालय येथे स्विकारण्यात येणार

 


           

            कोल्हापूर, दि. 30 (जिमाका):  उचंगी प्रकल्पग्रस्तानी अद्यापही जमिन अथवा विशेष आर्थिक सहाय्य मिळणेबाबतचे अर्ज तसेच रहिवाशी भुखंड मागणीचे अर्ज दिलेले नाहीत अशा प्रकल्पग्रस्ताचे अर्ज ज्या इतर विषयाबाबतचे अर्ज तसेच प्रकल्पातील 13 प्रकल्पग्रस्ताचे पॅकेज मिळण्याबाबतचे अर्ज त्यांचे कौटुंबिक व इतर कारणास्तव करारनामा करण्यासाठी प्रलंबित आहेत अशा प्रकल्पग्रस्तांनी सुध्दा दि. 3 डिसेंबर 2021 इ रोजी तहसिलदार कार्यालय आजरा येथे सकाळी 11.00 वा. स्विकारण्यात येणार असल्याचे आजरा-भुदरगडच्या उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे यांनी कळविले आहे.

          दि. 30 डिसेंबर रेाजी अर्ज जमा करण्याची दक्षता घ्यावी. अर्ज नमुद दिनांकापूर्वी प्राप्त न झाल्यास आपणास पुनर्वसनाची आवश्यकता नाही असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे (ज्या प्रकल्पग्रस्ताना अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे व इतर दाखले आवश्यक आहेत अशी कागदपत्रे ही त्याच दिवशी तहसिलदार कार्या आजरा येथून उपलब्ध होतील.) ,

            आजरा तालुक्यातील उचंगी या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे सकारात्मक प्रतिसादामुळे प्रकल्पाचे पुनर्वसनाचे काम प्रगती पथावर असून प्रकल्पातील पाण्यामुळे मोठे फायदे मिळणार आहेत.

 जमीन व पॅकेज वाटप- पुनर्वसनाअंतर्गत आजअखेर 89 प्रकल्पग्रस्ताना 49.53 हे आर क्षेत्र, 51 प्रकल्पग्रस्तांना देय क्षेत्र 26.85 है और ऐवजी 10 कोटी 73 लक्ष इतके विशेष आर्थिक सहाय्य व 43 प्रकल्पग्रस्तांना -20.75 है आरक्षेत्र तसेच त्यामधील 11 प्रस्तांना 3.57 हे आर देय क्षेत्राऐवजी 1 कोटी 42 लक्ष इतके विशेष आर्थिक सहाय्य वाटप करून देय क्षेत्राचे वाटप पूर्ण करण्यात आलेले आहे.

 

शिस्तक प्रकल्पग्रस्त- सद्यस्थितीमध्ये 74 प्रकल्पग्रस्ताना 33.87 है आर इतके क्षेत्र वाटप करणे शिल्लक आहे यातील अद्यापही 41 प्रकल्पवस्तानी 1963 है आर क्षेत्राबाबत जमीन अथवा विशेष आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत अर्ज सादर केलेले नाही.

 

उपलब्ध पर्यायी जमीन व पॅकेज- उचंगी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी शासनाने मौजे चितळे, ता. आजरा येथील गट क्र 46/31 मधील क्षेत्र 10.01. गट क्र. 233 मधील 372 है आर व गट क्र. 266 मधील क्षेत्र 3 13 है आर. असे एकूण 16 86 है आर तसेच मौजे जेऊर येथील गट क्र. 106 मधील 4:27 है आर. असे एकूण 21.13 हे आर गायरान क्षेत्र उपलब्ध करुन देणेत आलेले आहे तसेच उचगी प्रकल्पाचे लाभक्षेत्रामधील 7.65 है आर. इतके क्षेत्र वाटपासाठी उपलब्ध आहे. तसेच पर्यायी जमीनीऐवजी तिप्पट देयतेने म्हणजेच रु. 40 लक्ष प्रती हेक्टरी या दराने विशेष आर्थिक सहाय्य देणेस मान्यता देणेत आलेली आहे.

 

रहिवासी भुखंड- उचंगी प्रकल्पातील ज्या प्रकल्पग्रस्तांना रहिवासी भुखंड देय आहे. अशा प्रकल्पग्रस्तांची यादी[संपादन] मंडळाचे गावामधील कार्यालयामध्ये उपलब्ध करून देणेत आलेली आहे.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.