सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

दिव्यांग क्षेत्रात अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी अहवाल सादर करावा

 


कोल्हापूर दि. 22 (जिमाका) : 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जिल्ह्यातील दिव्यांग क्षेत्रात अतिउत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्याचे जिल्हा परिषदेने ठरविले आहे. त्याअनुषंगाने अशा व्यक्ती व संस्थांनी आपण केलेल्या कामाचा संक्षिप्त अहवाल छायाचित्रासह दि. 30 नोव्हेंबर पर्यंत समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे सादर करावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.