कोल्हापूर दि. 22 (जिमाका)
: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2021-22 अंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना
50 टक्के अनुदानावर हरितगृह व शेडनेट गृहाचा लाभ दिला जातो. त्यासाठी महाडीबीटी या
आपले सरकार पोर्टलवरील
mahadbtmahait.gov.in या लिंकव्दारे
लाभार्थ्यांनी मागणी करावयाची आहे. जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी केबल ॲण्ड पोस्ट
प्रकारच्या शेडनेटगृहाचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर मागणी नोंद करावी, असे
आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.
याअंतर्गत नव्याने केबल ॲण्ड
पोस्ट प्रकारचे शेडनेटगृहाचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आला आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.