कोल्हापूर दि. 22 (जिमाका)
: केंद्र शासनाच्या
दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभाग व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, भारत सरकार यांच्यामार्फत
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत पूर्व शिष्यवृत्ती, शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती, उच्चश्रेणी
शिक्षण शिष्यवृत्ती, राष्ट्रीय ओवरसीज शिष्यवृत्ती, राष्ट्रीय फेलोशिप व निःशुल्क
कोचिंग अशा सहा शिष्यवृत्तीच्या योजना कार्यान्वीत आहेत. पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी
ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा समाज
कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या सुचनेनुसार
दिव्यांग विद्यार्थ्यासाठी शालांत पूर्व शिष्यवृत्ती, शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती,
उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या तीनही शिष्यवृत्ती
योजना राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल माध्यमातून
कार्यान्वीत करण्यात येत आहेत आणि शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांना DBT मार्फत
PEMS प्रणालीव्दारे त्यांच्या बँक खात्यावर पाठविली जाणार आहे.
वरील तिन्ही शिष्यवृत्ती
योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती (www.scholarship.gov.in)
या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. दिव्यांग विद्यार्थ्यासाठी शालांत परीक्षोत्तर
शिष्यवृत्ती व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी
उच्चश्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी
नोंदणी दि. 30 नोव्हेंबर रोजी व संस्था पडताळणी दि. 15 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.