कोल्हापूर, दि. 9 (जिमाका)
:
सर्व नगरपालिका क्षेत्रांमध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करून घेणे
तसेच अपूर्ण प्रस्तावांतील कागदपत्रांची पुर्तता करुन घेण्याबाबत शुक्रवार दि. 12
नोव्हेंबर रोजी कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संबंधित
नगरपालिका/नगरपरिषद/ नगरपंचायत येथील कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन समाज
कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
सामाजिक
न्याय व विशेष सहाय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील
नागरिकांसाठी रमाई आवास (घरकूल) योजना (शहरी) राबवण्यासाठी शासन निर्णय दि. 9
मार्च 2021 मधील अटी व शर्तीनुसार घरकुलांचा लाभ देण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुषंगाने अनुसूचित जाती व नवबौध्द
प्रवर्गातील ज्या ज्या व्यक्तींना अद्यापही स्वतःचे पक्के घर उपलब्ध झाले नाही अशा
नगरपालिका हद्दीतील व्यक्तींसाठी मुख्याधिकारी (सर्व) नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत
यांनी कॅम्प आयोजित करून गरजू व्यक्तींचे अर्ज भरून घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी
राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.