कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): महाराष्ट्र विधानपरिषद
स्थानिक प्राधिकारी व्दिवार्षिक निवडणूक 2021 च्या अनुषंगाने प्राप्त तक्रारींच्या
निराकरणासाठी कोल्हापूर जिल्ह्याकरीता तक्रार निवारण कक्ष व नियंत्रण कक्ष गठीत
करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
या नियंत्रण
कक्षाचे कामकाज (24X7) सुरु राहणार असून
यासाठी नोडल अधिकारी म्हणून सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी व्दिवार्षिक
निवडणूक 2021 च्या अनुषंगाने तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार निवारण कक्ष व नियंत्रण
कक्षामधील दूरध्वनी क्रमांक (0231) 2655579 किंवा नोडल अधिकारी यांचा भ्रमणध्वनी
9226342943 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा kolhapurdso@gmail.com या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवायची आहे.
आचारसंहिता कक्ष
स्थापन
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये
आचारसंहितेचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आदर्श
आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून अपर
जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. या
कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2654812 असून ई-मेल rdckop@gmail.com असा आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांनी आचारसंहिता
उल्लंघनाविषयी तक्रारी असल्यास या दूरध्वनीवर किंवा ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
आचारसंहिता
कक्षामध्ये निवडणुकीसंदर्भात विविध प्रकारच्या परवानग्या देण्यासाठी एक खिड़की
कक्ष सुरु करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी
भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथक इ. पथकांची स्थापना करण्याची कार्यवाही करण्यात
येत आहे.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.