कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) : जिल्हा नियोजन समितीची सभा सोमवार दि. 8
नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 12 वा. ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
येथे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी
माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव राहुल रेखावार यांनी
दिली.
या बैठकीत दि. 23 जानेवारी 2021 रोजी संपन्न
झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्तास व इतिवृत्त कार्यपूर्ती
अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना माहे मार्च 2021 अखेरच्या खर्चास व पुनर्विनियोजनास
कार्योत्तर मंजुरी देणे, सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन 2021-22 कोविड
-19 च्या प्रादुर्भावावरील उपाय योजना करण्यासाठी मान्यता दिलेल्या कामांना व
पुनर्विनियोजनास कार्योत्तर मंजुरी देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 आढवा
घेणे व आयत्यावेळचे विषय, असे विषय होणार
आहेत.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.