कोल्हापूर दि. 25
(जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत खासगी
शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड करण्यास इच्छुक लाभधारकांनी प्रस्ताव सादर
करावेत, असे आवाहन पन्हाळा सामाजिक वनिकरणचे वनक्षेत्रपाल तु.र. गायकवाड यांनी
केले आहे.
सामाजिक वनिकरण विभागामार्फत
म.ग्रा.रो.ह. योजनेंतर्गत खासगी शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवडीचे काम
घेण्याकरिता खासगी लाभधारक बांधावर वृक्ष लागवड अंतर्गत दारिद्रय रेषेखालील,
अल्पभूधारक, लहान शेतकरी, 1 हेक्टर क्षेत्राच्या आतील शेतकऱ्यांना वृक्ष
लागवडीकरिता अनुदान मिळते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी
बैठकीमध्ये प्रत्येक गावामध्ये म.ग्रा.रो.ह.योजनेंतर्गत कामे घेण्याबाबत सक्त
सूचना दिलेल्या आहेत. या योजनेंतर्गत आपल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये
त्यांची नावे, 7/12 उतारा, 8 अ उताऱ्यासह प्रस्ताव या सामाजिक वनिकरण कार्यालयास
सादर करावेत.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.