मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०२१

गहू व हरभरा पिकांसाठी बीज प्रक्रिया मोहीम

 

 


कोल्हापूर, दि. 9  ( जिमाका ) : कृषि विभागामार्फत जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात गहू व हरभरा पिकांसाठी दिनांक 1 ते 15 नोव्हेंबर या कालावधील बीज प्रक्रिया मोहीम राबविण्यात येत असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय अन्न्‍ा सुरक्षा अभियान अन्नधान्य पिके सन 2021-22 अंतर्गत कडधान्य कार्यक्रमांतर्गत व भात पड क्षेत्रामध्ये कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी हरभरा पिकांची प्रात्यक्षिके तसेच बियाणे वितरण या  बाबी मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे.

पिकांच्या उत्पादन वाढीकरिता तसेच किड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी बीजप्रक्रीया मोहीम राबविण्यात येत आहे.  बीजप्रक्रीया प्रात्यक्षिके सर्व कृषि सहाय्यकांच्या कार्यक्षेत्रात घेण्यात येणार आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी बीजप्रक्रीया मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. वाकुरे यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.