सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या आपदग्रस्तांच्या कुटुंबियांनी नुकसान भरपाईची रक्कम जमा झाल्याबाबत खात्री करावी

 

     कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): माहे जुलै २०२१ मध्ये दि. २२ जुलै ते २५ जुलै २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती उद्भवलेली होती. त्यास अनुसरून भुदरगड तालुक्यामध्ये विविध ठिकाणी उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे दोन दिवसांपेक्षा अधिक काळ स्थलांतरीत होणे, घरपडझड/गोठा पडझड होणे, जनावरे/पक्षी मृत्यू पावणे, पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मयत व्यक्ती व शेतामध्ये पुराचे पाणी जाऊन शेतीपिकांचे नुकसान होणे या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या बाधित आपदग्रस्तांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई अंतर्गत शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान वाटप करण्यात आलेले असुन सर्व संबंधित आपदग्रस्त/लाभार्थी/शेतकरी यांनी आपापल्या बँकेशी संपर्क साधुन आपल्या बँक खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाल्याबाबत खात्री करावी, नसल्यास भुदरगड तहसिलदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा तहसिलदार अश्विनी वरुटे यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.