कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती
कार्यालय): 1 डिसेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत सक्रीय कुष्ठरूग्ण
शोध व नियमित सनियंत्रण अभियान राबविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी, लोकसहभाग
यांच्या माध्यमातून हे अभियान 100 टक्के यशस्वी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांनी आज दिले.
जिल्हा
समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीस अवैद्यकीय
पर्यवेक्षक संतोष नागपूरकर यांनी संगणकीय सादरीकरण करून या अभियानाबाबत सविस्तर
माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, आशा, स्त्री स्वयंसेविका, पुरूष
स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी यांना प्रशिक्षण द्यावे. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य
तसेच गावातील नागरिक यांच्याशी चर्चा करून याबाबत सविस्तर माहिती घ्यावी. हे
अभियान 100 टक्के यशस्वी करण्याच्या दृष्टिने खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचाही
सहभाग घ्यावा.
अभियानाचा मूळ उद्देश-
समाजातील
लपून राहिलेले कुष्ठरूग्ण लवकरात- लवकर व विना विकृती शोधून काढून त्यांना त्वरित
बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नवीन सांसर्गिक कुष्ठरूग्ण शोधून बहुविध औषधोपचाराखाली
आणून संसर्गाची साखळी खंडीत होऊन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे. कुष्ठरोग
दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे.
अ.क्र. |
तपशिल |
सर्व्हेक्षणासाठी
निवडलेली गावे |
सर्व्हेक्षणासाठी
निवडलेला नागरी भाग |
एकूण |
एकूण
लोकसंख्या |
आशा/स्त्री
स्वयंसेविका |
पुरूष
स्वयंसेवक/ आ. कर्मचारी |
1 |
अति जोखमीचे
तालुके (भुदरगड, हातकणंगले, कागल व करवीर) |
233 |
25 |
258 |
1304324 |
1067 |
801 |
2 |
कमी जोखमीचे
तालुके (आजरा, चंदगड, ग. बावडा,गडहिंग्लज, रा. नगरी, पन्हाळा, शा. वाडी व शिरोळ) |
341 |
5 |
346 |
967828 |
876 |
602 |
3 |
कमी जोखमीच्या
तालुक्यातील जोखमीची गावे (लखीकट्टी, ता. चंदगड) |
1 |
0 |
1 |
1142 |
1 |
1 |
|
एकूण |
575 |
30 |
605 |
2273294 |
1944 |
1404 |
कुष्ठरोग
हा हमखास बरा होणारा आजार असून लवकर निदान झाल्यास भविष्यात येणाऱ्या विकृतीपासून
बचाव केला जावू शकतो. या अभियानास विविध प्रसिध्दी माध्यमांव्दारे प्रसिध्दी देवून
सर्व घटकांचा सहभाग मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे समाजातील कुष्ठरोगाबाबतची भीती
दूर होवून कुष्ठरोगाची संशयित लक्षणे आढळून आल्यास स्वत:हून तपासणीसाठी पुढे
येण्याची प्रवृत्ती वाढीला लागेल. त्यामुळे कुष्ठरोग निर्मुलन होण्यास मोठी मदत
होईल अशी संकल्पना आहे.
या
बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, डॉ. एम.ए.देसाई, जिल्हा हिवताप
अधिकारी डॉ. विनोद मोरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. स्मिता खंदारे, वैद्यकीय
अधिकारी डॉ. महेंद्र फाळके, जिल्हा आशा समन्वयक एन.ई.खान, सहाय्यक संचालक डॉ.
प्रकाश पाटील, वैद्यकीय अधिक्षक डॉ. आर.व्ही. जाधव उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.