कोल्हापूर दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) : 14 नोव्हेंबर या बालदिवसाच्या निमित्ताने
बालकांच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी इयत्ता 1 ली ते 12 वी च्या
विद्यार्थ्यांसाठी 7 ते 14 हा सप्ताह बालदिवस सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार
असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.आय.सी.शेख यांनी
दिली.
या उपक्रमात भाग
घेताना विद्यार्थ्यांनी आपले पालक, शिक्षक यांच्या फेसबुक अकांऊटवरून #baldivas 2020
या हॅशटॅगचा वापर करून व्हिडीओ, फोटो अपलोड
करावेत. त्याचबरोबर इंस्टाग्राम, व्टिटरवर देखील #baldivas 2020
हा हॅशटॅग वापरून अपलोड करू शकतील.
या
निमित्ताने 7 गटात विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत. प्रत्येक उपक्रमासाठी तालुका,
जिल्हा व राज्य स्तरावर प्रथम तीन क्रमांक निवडण्यात येतील. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना
प्रशस्तीपत्र व रोख रक्कम बक्षीस देण्यात येईल. उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना
सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
8
नोव्हेंबर रोजी इ. 1 ली ते 2 री साठी भाषण- मी नेहरू बोलतोय या विषयावर 3
मिनीटांचा व्हिडीओ अपलोड करणे. 9 नोव्हेंबर रोजी इ. 3 री ते 5 वी साठी पत्रलेखन-
चाचा नेहरूंना पत्र लिहा (शब्द मर्यादा 300) एफोर साईज कागदावर लिहून अपलोड करणे.
10 नोव्हेंबर रोजी इ. 6 वी ते 8 वी साठी स्वलिखित कविता वाचन- नेहरूंवरून
स्वत: लिहिलेल्या कवितेचे वाचन करून त्याचा व्हिडीओ अपलोड करणे. 11 नोव्हेंबर रोजी
इ. 6 वी ते 8 वी साठी नाट्यछटा/ एकपात्री- नेहरूजींच्या जीवनावर आधारित 3
मिनीटांचा व्हिडीओ अपलोड करणे. 12 नोव्हेंबर रोजी इ. 9 वी ते 10 साठी पोस्टर
करणे- स्वातंत्र्य संग्रामातील नेहरूजींच्या जीवनावर आधारित प्रसंग चित्र
रेखाटणे व पोस्टर अपलोड करणे. इ. 11 वी ते 12 वी साठी निबंध लेखन-
स्वातंत्र्य संग्रामातील नेहरूंचे योगदान, नेहरू औद्योगिक विकासाचा पाया रचनारे व
नेहरू विज्ञान व तंत्रज्ञान (शब्द मर्यादा 900 ते 1000) निबंध लिहून अपलोड करणे.
13 नोव्हेंबर रोजी इ. 9 वी ते 10 वी साठी निबंध लेखन- नेहरू स्वातंत्र्यानंतर
देशाच्या जडण घटणातील वाटा, नेहरू भारताचा शोध आत्मचरित्र (शब्द मर्यादा 700 ते
800) निबंध लिहून अपलोड करणे. इ. 11 वी ते 12 वी साठी व्हिडीओ तयार करणे-
नेहरूंच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंटरी तयार करणे (5 मिनीटांचा व्हिडीओ अपलोड
करणे) 14 नोव्हेंबर रोजी इ. 1 ते 12 वी
साठी बाल साहित्य ई-संमेलन- नेहरूंशी संबंधित कथा, कविता, प्रसंग सादर करणे
(स्वरचित) वेळ 3 मिनीटे
या
उपक्रमाबाबतचे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री.
शेख यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.