कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) :भारत निवडणूक आयोगाने आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 1
जानेवारी 2021 पासून (Qualifying)
आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला
आहे. मतदार यादीत नाव नोंदणीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, संबंधित तहसिल
कार्यालयातील निवडणूक शाखा तसेच https://www.nvsp.in/ या आयोगाच्या
प्रणालीवर ऑनलाईन सादर करावे. तसेच, 15 डिसेंबर 2020 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात
येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
या कार्यक्रमामध्ये दिनांक 16
नोव्हेंबर, 2020 प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी, दावे व हरकती स्विकारण्याचा
कालावधी दिनांक 16 नोव्हेंबर 2020 ते दिनांक 15 डिसेंबर, 2020, दिनांक 05
जानेवारी, 2021 पर्यंत दावे व हरकती निकाली काढणे, दिनांक 14 जानेवारी, 2021 पर्यंत
प्रारुप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिध्दी
करिता आयोगाची परवानगी घेणे, डाटाबेसचे अद्यावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई करणे, दिनांक 15
जानेवारी 2021 अंतिम मतदार यादी प्रसिध्दी समावेश आहे.
या कार्यक्रमात दिनांक 16
नोव्हेंबर 2020 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करणेत
येईल. सदरची मतदार यादी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी(ERO), सहायक
मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार (ERO), मतदान केंद्रस्तरीय अधिकारी(BLO)
यांचेकडे अवलोकनार्थ साठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सदरची मतदार यादी आयोगाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ किंवा
जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या https://kolhapur.gov.in/ या संकेतस्थळावर देखील उपलब्ध
आहे.
दिनांक 16
नोव्हेंबर 2020 ते दिनांक 15 डिसेंबर, 2020 या कालावधीत
दावे व हरकती (नमुना क्रमांक 06,06अ, 07, 08 व 08अ) मतदान केंद्रस्तरीय अधिकारी
(BLO) किंवा संबंधित तालुकेतील तहसिल कार्यालय (निवडणूक शाखा) यांचेकडे स्विकारणेत
येणार आहेत.
मतदार यादीत
नांव नोंदणीसाठी पात्र, तथापी अद्यापही मतदार यादीत नांव सामाविष्ट नसलेल्या सर्व
पात्र नागरीकांना मतदार यादीत नांव सामाविष्ट करणेसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली
आहे.
मतदारांनी आपले
आवश्यकतेप्रमाणे खालील अर्ज भरुन देणेत यावे.
1) नमुना क्रमांक 6 (मतदार यादीत
नांव सामाविष्ट करावयासाठी अर्ज)
2) नमुना क्रमांक 7 (मतदार यादीतील
नांवाची वगळणी करावयासाठी अर्ज)
3) नमुना क्रमांक 08 (मतदार यादीतील
तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी अर्ज)
4) नमुना क्रमांक 08अ (एकाच मतदार
संघात मतदार यादीचे नोंदीचे स्थानांतर करावयासाठी अर्ज)
मतदारांनी आपले
आवश्यकतेप्रमाणे वरील नमुने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा संबंधित
तालुकेतील तहसिल कार्यालय (निवडणूक शाखा) यांचेकडे सादर करावेत किंवा मा. आयोगाने
विकसित केलेल्या https://www.nvsp.in/ या
प्रणालीवर ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात यावे.
निवडणूक आयोगाच्या https://www.nvsp.in/ या
प्रणालीवर ऑनलाईन अर्ज सादर करताना मतदारांनी यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक अचूक
नमूद करावे. मतदार यादीत नावाची नोंद असेल तरच निवडणूकीत आपल्या मतदानाचा हक्क
बजावता येतो. सबब, सदर कार्यक्रमातंर्गत आपली नोंदणी प्राधान्याने करावी, असे
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कोल्हापूर यांचे वतीने आवाहन केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.