कोल्हापूर दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल
मुंबई यांच्या कार्यालयामध्ये १७ डिसेंबर २०२० रोजी ११३ वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे, असे मुख्य पोस्टमास्टर जनरल, मुंबई यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
महाराष्ट्र आणि गोवा
राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवे विषयी किंवा कामकाजाबद्धल ज्या तक्रारींचे निवारण
सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक
अदालत मध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तू/मनी ऑर्डर/बचत बँक खाते/प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या, तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह
केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवीली असेल त्याचे नांव व हुद्दा इत्यादी.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार एच. एम.
मंजेश, सहायक निदेशक डाकसेवा (ज.शि.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर
जनरल यांचे कार्यालय, मुंबई जी. पी. ओ. इमारत, दुसरा माळा, मुंबई – ४००००१ यांचे नावे दोन प्रती सह दिनांक १५.११.२०२० पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल
अशा रितीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. प्रपत्र महाराष्ट्र टपाल सर्कलच्या
वेबसाइट – www.maharashtrapost.gov.in वर उपलब्ध आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.