गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

बेरोजगारीवर मात करण्यासाठी स्वयंरोजगाराची कास धरा- हेमंत खेर

 


कोल्हापूर दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) :  ग्रामीण भागातील महिलांनी बेरोजगारीवर मात करण्यासाठी स्वयंरोजगाराची कास धरावी व त्यातून आपली, आपल्या कुटुंबाची उन्नती साधत पर्यायाने देशाच्या विकासात हातभार लावावा, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे कोल्हापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक हेमंत खेर यांनी केले.

बँक ऑफ इंडिया द्वारा पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूर तर्फे ४ नोव्हेंबर २०२० रोजी ३० दिवसांच्या महिला शिंपी (टेलर) प्रशिक्षणाचा सांगता समारोह झाला. त्याप्रसंगी बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री. खेर बोलत होते. कार्यक्रमास स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान (आरसेटी) कोल्हापूरच्या संचालिका सोनाली चतूर, तांत्रिक प्रशिक्षिका संचिता कुलकर्णी, आरसेटीचे  मदन पाटील, विष्णू मांगोरे उपस्थित होते.

            श्री. खेर म्हणाले, महिलांनी आपल्या अंगी असलेल्या  कलागुणांचा उपयोग करून छोटे मोठे व्यवसाय सुरु केले पाहिजेत. व्यवसाय वाढवण्यासाठी आवश्यक कर्ज घेवून व ते नियमित परतफेड करून बँकेत आपली पत निर्माण केली पाहिजे.

कार्यक्रमात ३३ प्रशिक्षणार्थी महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.