कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील कंटेन्टमेट झोनच्या बाहेरील सिनेमा
हॉल्स, थिएटर्स, मल्टीप्लेक्सेस, ड्रामा थिएटर्स हे 50% बसणेच्या क्षमतेच्या अधिन
राहून तसेच कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील राज्य, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय
स्तरावरील जलतरण खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी जलतरण तलाव, योग वर्ग, अंतर्गत खेळ व
चित्रपट गृहे दिनांक 5 नोव्हेंबर 2020
पासून मार्गदर्शक तत्वानुसार सुरू करणेस परवानगी देण्यात आली आहे. मात्र
सिनेमा हॉल्स, थिएटर्स, मल्टीप्लेक्सेस, ड्रामा थिएटर्स मध्ये खाणेचे पदार्थ आणणेस
परवानगी असणार नाही, असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी दिले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील आदेशानुसार
कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील राज्य, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरण
खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी जलतरण तलाव, योग वर्ग, अंतर्गत खेळ व चित्रपट गृहे
दिनांक 5 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करणेसाठी परवानगी देणेत आलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील
कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील राज्य, राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरण
खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी जलतरण तलाव, योग वर्ग, अंतर्गत खेळ व चित्रपट गृहे
दिनांक 5 नोव्हेंबर 2020 पासून सुरु करणेसाठी खालील प्रमाणे परवानगी देणेत येत आहे.
१) केन्टेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव हे
राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धकांना प्रशिक्षण देण्यासाठी दिनांक 5 नोव्हेंबर 2020 पासून वापरण्यास / सुरु करणेस परवानगी असेल. याबाबतची
मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक सूचना या
शासनाच्या क्रिडा व युवक कल्याण विभागामार्फत निर्गमित करणेत येईल. सदर मार्गदर्शक
सूचना निर्गमित करताना भारत सरकारकडील क्रिडा व युवक कल्याण मंत्रालयाने निर्गमित
केलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेण्यात येतील.
२) कन्टेनमेंट झोनच्या
बाहेरील योगा प्रशिक्षण केंद्र दिनांक 5 नोव्हेंबर 2020 पासून सुरू करणेस परवानगी
असेल. याबाबतची मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक सूचना या शासनाच्या सार्वजनिक
आरोग्य विभागामार्फत निर्गमित करणेत येईल. सदर मार्गदर्शक सूचना निर्गमित करताना
भारत सरकारकडील आरोग्य आणि कुंटुंब कल्याण मंत्रालयाने निर्गमित केलेल्या
मार्गदर्शक सूचना विचारात घेण्यात येतील.
३) सर्व प्रकारचे Indoor
Games जसेकी बॅडमिंटन, टेनीस, स्क्वॅश, शुटींग रेंज इत्यादी खेळ हे योग्य सामाजिक
अंतर आणि निर्जतुकीकरण विषयक उपाययोजना राबवून दिनांक 5 नोव्हेंबर 2020 पासून चालू
करणेस परवानगी असेल.
४) कन्टेनमेंट झोनच्या
बाहेरील सिनेमा हॉल्स, थिएटर्स, मल्टीप्लेक्सेस, ड्रामा थिएटर्स हे 50% बसणेच्या
क्षमतेच्या अधिन राहून दिनांक 5 नोव्हेंबर
2020 पासून सुरू करणेस परवानगी असेल. सिनेमा हॉल्स, थिएटर्स, मल्टीप्लेक्सेस,
ड्रामा थिएटर्स मध्ये खाणेचे पदार्थ आणणेस परवानगी असणार नाही. याबाबतची मानक
कार्यप्रणाली / मार्गदर्शक सूचना या शासनाच्या सास्कृंतिक कार्य विभागामार्फत आणि
स्थानिक प्रशासनामार्फत निर्गमित करणेत येईल. सदर मार्गदर्शक सूचना निर्गमित
करताना भारत सरकारकडील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने निर्गमित केलेल्या
मार्गदर्शक सूचना विचारात घेण्यात येतील.
यापूर्वी कोविड -19
व्यवस्थापनासाठी विहित केलेले शारिरिक अंतराचे व संसर्ग न पसरणेबाबत वेळोवेळी
देणेत आलेल्या निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असेल.
आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम
2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल
याची नोंद घ्यावी.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.