बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२०

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे - जिल्हाधिकारी दौलत देसाई


 


 

कोल्हापूर दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर शिक्षक मतदारसंघातील रिक्त झालेल्या जागेसाठी व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला आहे.  दि. 2 नोव्हेंबर  पासून आचारसंहिता लागू केली असून दिनांक 1 डिसेंबर रोजी मतदान तर दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत केले.

महाराष्ट्र राज्य विधान परिषदेतील पदवीधर/शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेल्या पुणे विभाग पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातील सदस्यांची मुदत दि. 19 जुलै 2020 रोजी समाप्त झाली आहे.  निवडणूक कार्यक्रम

·         निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 5 नोव्हेंबर 2020 (गुरूवार)

·         नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक 12 नोव्हेंबर 2020 (गुरूवार)

·         नामनिर्देशन पत्रांची छाननी 13 नोव्हेंबर 2020 (शुक्रवार)

·         उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 17 नोव्हेंबर 2020 (मंगळवार)

·         मतदान 1 डिसेंबर 2020 (मंगळवार),

·         मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत,

·         मतमोजणीचा दिनांक 3 डिसेंबर 2020 (गुरूवार)

निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक 7 डिसेंबर 2020 (सोमवार) असून या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त काम पाहणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 205 मतदान केंद्रे तर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 76 मतदान केंद्रे आहेत.  जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 87 हजार 915 तर शिक्षक मतदारसंघासाठी 11 हजार 997 इतके मतदार आहेत.

आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर पालनाच्या दृष्टिकोनातून भारत निर्वाचन आयोग यांच्या कार्यालयाकडील दिनांक 26 डिसेंबर 2016 च्या पत्रात नमुद सुचनांचे तंतोंतंत पालन करण्यात येत आहेत.

कायदा व सुव्यवस्था कक्ष आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याकामी समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

मुद्रण साहित्य छपाई व प्रकाशनाबाबत लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या 127 A मध्ये नमूद मार्गदर्शक सुचनाचे काटेकोर पालन करण्यात येत आहे.

कोव्हिड-19 च्या अनुषंगाने भारत निर्वाचन आयोग यांनी दिलेल्या सुचनेनुसार नामनिर्देशनाचे वेळी उमेदवारासोबत केवळ 2 व्यक्तींना प्रवेश देण्यात येईल, तसेच नामनिर्देशनाच्या वेळी केवळ 2 वाहनांना परवानगी देण्यात येईल.

घरोघरी प्रचार करतांना उमेदवारासह केवळ 5 व्यक्तींना परवानगी देण्यात येईल. रोड शो च्या वेळी केवळ 5 वाहनांना परवानगी देण्यात येईल, तसेच वाहनांमध्ये 100 मीटर अंतर आवश्यक आहे.

सर्व राजकीय पक्षांनी कोव्हिड-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतर राखुन सभा/रॅली इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्याचे आहेत. तसेच कार्यक्रमाच्या वेळी मास्क, सॅनिटायझर इत्यादीचा वापर करण्यात यावा.

जिल्हा शल्य चिकित्सक तसेच  जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कोव्हिड-19 च्या अनुषंगाने कम्युनिकेशन प्लॅन तयार करण्यात येत आहेत. मतदान  केंद्रावर सुयोग्य सॅनिटायझेशन, मास्क, सॅनिटायझर, थर्मल गन इत्यादी ची सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

मतदान पथकाच्या आरोग्याची काळजी घेणे तसेच रुग्‍णवाहिका व आवश्यक औषध साठा तयार ठेवण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

कोविड-19 विषयी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.

 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.