इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, २४ नोव्हेंबर, २०२०

पदवीधर आणि शिक्षक मतदान केंद्रासाठी 1840 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण

 


 

       कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी अशा एकूण 1840 जणांचे दुसरे प्रशिक्षण आज तालुकास्तरावर झाले. त्याचबरोबर 366 मायक्रो ऑब्झरवरांचे प्रशिक्षण पार पडले, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

        जिल्ह्यात पदवीधरसाठी 205 आणि शिक्षकसाठी 76 असे एकूण 281 मतदान केंद्रांची संख्या आहे. पदवीधर मतदान केंद्रासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक 1, मतदान अधिकारी क्रमांक 2, मतदान अधिकारी क्रमांक 3 आणि शिपाई असे एकूण 1025 जणांची नियुक्ती आहे. यासाठी 315 राखीव ठेवण्यात आले आहेत, असे एकूण 1340 नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण तालुकास्तरावर पार पडले.

            शिक्षक मतदान केंद्रासाठी 380 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून 120 राखीव ठेवण्यात आले आहेत, अशा एकूण 500 अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले. त्याचबरोबर 281 मायक्रो ऑब्झरवर, 85 राखीव अशा एकूण 366 जणांचेही प्रशिक्षण आज झाले. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातूनही ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले.

            आजच्या प्रशिक्षणात मतदान प्रक्रियेचे कामकाज, मतदान कक्षाची रचना, मतदान पेटीचा वापर कसा करावा, मत पत्रिका, विविध शिक्के, शाई, स्केचपेन यांचा योग्य ठिकाणी कसा वापर करावा, मतदार ओळखपत्र तपासणी, विविध प्रकारचे नमुने व फॉर्म्स कसे भरावेत. त्याचबरोबर मास्क, सॅनिटाझर, थर्मल स्कॅनर, सामाजिक अंतर याबाबतही आजच्या प्रशिक्षणात सूचना देण्यात आल्या.

                                               0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.