कोल्हापूर दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय) : मास्कची
विक्री शासनाने निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा जास्त किंमतीने कोणत्याही घाऊक अथवा
किरकोळ औषध विक्रेते यांच्यामार्फत होत असल्यास त्याबाबतची तक्रार सहाय्यक आयुक्त,
अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूर येथे 0231-2641091 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा fdakolhapurdrug@gmail.com या ई-मेलवर करावी, असे आवाहन अन्न व औषध
प्रशासनचे सहाय्यक आयुक्त स.सु.घुणकीकर यांनी केले आहे.
कोव्हिड 19
साथरोगापूर्वी व साथरोगानंतर मास्क (2 प्लाय, 3 प्लाय व एन 95) यांच्या किंमतीत
प्रचंड वाढ झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने 20 ऑक्टोबर 2020
च्या शासन निर्णयानुसार सर्व सामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात मास्क उपलब्ध
करून देण्यासाठी मास्कची दर्जानुसार अधिकतम विक्री मूल्य निश्चित केले आहे.
त्यानुसार सर्व घाऊक व किरकोळ विक्रेते यांनी त्यांच्या आस्थापनेच्या दर्शनी भागात
शासनाने निश्चित केलेल्या मास्क दराचे फलक लावणे व मास्कची विक्री त्याच दराने
करणे आवश्यक आहे, असेही श्री. घुणकीकर यांनी
कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.