गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

एमसीईडी मार्फत माजी सैनिक/विधवा पत्नी, पाल्यांसाठी उद्योजकता जागृती प्रशिक्षण

 


 

          कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोना संसर्गजन्य रोगाच्या परिस्थितीवर स्वयंरोजगार उद्योजकतेवर आधारित नवीन उद्योग उभारण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत (एमसीईडी) राज्यातील माजी सैनिक/विधवा पत्नी व त्यांचे पाल्यांसाठी 05 दिवसाचे अनिवासी ऑनलाईन उद्योजकता जागृती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

          जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक/विधवा पत्नी व त्यांचे पाल्यांनी दि. 25 नोव्हेंबर पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, लाईन बाझार रोड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे कार्यालयीन वेळेत नाव नोंद करावे. नाव नोंद करताना डिसचार्ज पुस्तक, ओळखपत्र, पी.पी.ओ.ची छायांकित प्रत, मोबाईल नंबर आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 0231-2665812  येथे संपर्क साधावा.

         

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.