सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

ऑनलाईन जॉब फेअरचे आयोजन इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा - सहायक आयुक्त सं.कृ. माळी

 


       कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय):  जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन जॉब फेअरचे दि 24 ते 26 नोव्हेंबर या कालावधीत आयोजीत केले असल्याचे कौशल्य विकास,रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त सं.कृ. माळी यांनी कळविले आहे. 

          हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोदविणा-या उमेदवारांसाठीच आहे. जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा. युझर आयडी पासवर्डच्या आधारे www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी पसंतीक्रम उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी.

          इच्छुक ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार उद्योजकांच्या सोईनुसार मुलाखतीचे ठिकाण, दिनांक वेळ एसएमएस अलर्टं द्वारे कळविण्यात येईल शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.

          इच्छुक युवक युवतींनी दि.24 नोव्हेंबर पर्यंत पसंतीक्रम नोंदवून या संधीचा चुकता लाभ घ्यावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री. माळी यांनी केले आहे.  अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र 0231-2545677 वर संपर्क साधावा. 

0 0 0 0  00

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.