कोल्हापूर,
दि. 18 (जि.मा.का.) : पुणे पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडील
मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाही करावी, तसेच जिल्हयातील प्रत्येक मतदान
केंद्राच्या ठिकाणी मतदार मदत कक्ष स्थापन करण्याबरोबरच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
आवश्यक उपाययोजनांना प्राधान्य देण्याची सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी
केली.
पुणे पदवीधर निवडणुकीच्या पूर्व तयारी
व नियोजनाबाबत जिल्हयातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांशी
आज व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या व्हिडीओ कॉन्फरन्सला अपर जिल्हाधिकारी किशोर
पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतिश
धुमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी
तसेच सर्व नोडल अधिकारी व समन्वय अधिकारी उपस्थित होते.
निवडणुकीच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या तयारीचा
आढावाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी घेतला. या निवडणुकीसाठी मोठी मतपत्रिका होणार
असल्याने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मतपत्रिकेची घडी कशी घालावी
याबाबत सर्वांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणी आवश्यक
सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार
मदत कक्ष स्थापन करावा, यासाठी तालुका आरोग्य
अधिकारी यांनी समन्वयक अधिकारी म्हणून काम करण्याची सूचनाही त्यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारांना मास्क आणि सामाजिक अंतराचे पालन करणे
महत्वाचे असून यासाठी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी महापालिका
क्षेत्रासाठी काम पहावे, अशी सूचनाही यावेळी त्यांनी केली.
कोरोनाच्या
पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंगचे मार्किंग करणे आवश्यक असून मतदानाच्या दिवशी अखंडीत
वीज पुरवठा राहील यांची खबरदारी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या
अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसेच अन्य पर्यायी व्यवस्थाही करुन ठेवावी. मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफीची
व्यवस्था करण्याची सूचनाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.