बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०

हरित लवादाच्या आदेशान्वये दिवाळीत फटाके फोडण्यासाठी सायं 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी - जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 

 

          कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय) : दिवाळी सणाच्या कालावधीत दि 13 ते 16 नोव्हेंबरपर्यंत महानगरपालिका व सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये हरीत लवादाच्या आदेशान्वये कोविड-19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘Green firecrackers’ वाजवणे किंवा फोडण्यासाठी सायंकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगीचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

          नवी दिल्ली येथील हरित लवादाच्या आदेशान्वये कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर शोभेची दारु (फटाका) विक्री व त्याच्या वापराबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुसार १३ ते १६ नोव्हेंबर अखेर हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुढीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे.

          कोल्हापूर महानगरपालिका व जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रामध्ये फक्त ‘Green firecrckers’ ची विक्री करण्यास व वाजवणे-फोडण्यास परवानगी असेल. ‘Green firecrackers’ वाजवणे किंवा फोडण्यासाठी सायंकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत परवानगी असेल.

          आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात असलेबाबत तपासणी करण्याचे अधिकार पोलीस विभाग व संबंधीत महानगरपालिका व  नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत मधील अधिकारी / कर्मचारी यांना देण्यात आले आहे. येत आहेत.

          आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

 

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.