कोल्हापूर
दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय) :- सीपीआर रूग्णालय नॉन कोव्हिड
रूग्णांसाठी टप्प्याटप्प्याने सुरू करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री
राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सीपीआर प्रशासनास दिल्या.
आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी आज प्रभारी
अधीष्ठाता डॉ. आरती घोरपडे यांच्याशी दूरध्वनीव्दारे संपर्क साधून या सूचना
दिल्या. सीपीआर नॉन कोव्हिड रूग्णांसाठी सुरू करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
कोव्हिड रूग्णांसाठी वापरलेले वॉर्डचे निर्जंतुकीकरण करून मगच नॉन कोव्हिड
रूग्णांवर या ठिकाणी उपचार करावेत,अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.