कोल्हापूर दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जवाहर नवोदय निवासी विद्यालयात सन 2021 साठी इ. 6 वीसाठी होणारी प्रवेश परीक्षा शनिवार
दि. 10 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11.30 ते दु. 1.30 या वेळेत प्रत्येक तालुक्याच्या
प्रमुख परीक्षा केंद्रांवर होणार आहे. परीक्षेचे ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांच्या
पालकांनी www.navodaya.gov.in व navodaya.gov.in/nvs/en/Admission-JNVST/JNVST-class/
या संकेतस्थळा 15 डिसेंबर पर्यंत भरावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे
प्राचार्य के. श्रीनिवासराव यांनी केले आहे.
परीक्षेचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया
पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इयत्ता 5 वी च्या वर्गात शिक्षण
घेणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. विद्यार्थी 5 वीच्या वर्गात जिल्ह्यातील
मान्यताप्राप्त विद्यालयात शिकत असला पाहिजे. विद्यार्थी 3 री, 4 थी व 5 वी मध्ये
सलग उत्तीर्ण असला पाहिजे. विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2008 पूर्वी किंवा 30 एप्रिल
2012 नंतरचा नसावा. विद्यार्थी 3 री, 4 थी व 5 वी या तीन वर्षामध्ये एक दिवस अथवा
एक वर्ष जर शहरी विभागात शिकला असेल तर तो शहरी विभागात गणला जाईल. विद्यार्थी 3
री, 4 थी व 5 वी सलग ग्रामीण विभागात शिकत असेल तर तो ग्रामीण विभागात गणला जाईल,
याची नोंद पालकांनी अर्ज भरताना घ्यावी. अधिक माहितीसाठी 02325-244197 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क
साधावा.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.