कोल्हापूर, दि. 21 - जयसिंगपूर येथील सत्वशील
बापूसाहेब जगदाळे यांना वन्यजीव अपराध नियंत्रण कार्यालयाच्यावतीने स्वयंसेवक म्हणून पुढील दोन वर्षासाठी मुदतवाढ
देण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथील वन्यजीव अपराध नियंत्रण
कार्यालयाच्या अतिरिक्त संचालक तिलोत्तमा वर्मा यांनी याबाबत नुकतेच पत्र पाठविले
आहे. संवेदनशीलता, सार्वजनिक शिक्षण, वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी सक्रिय
सहभाग आणि योगदान लक्षात घेऊन, वन्यजीव आणि त्यांच्या अवैध वाहतुकीविषयी माहिती
संग्रहण करण्याच्यादृष्टीने 31 मार्च 2022 पर्यंत पुढील दोन वर्षांसाठी
डब्ल्यूसीबी स्वयंसेवक म्हणून ही मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी 2 सप्टेंबर 2020
पर्यंत ही मुदत होती. वन्यजीव संरक्षणाच्या क्षेत्रात आपण यापूर्वी केलेल्या
योगदानासारखेच आपल्याकडून कामाची अपेक्षा करतो, असेही यात म्हटले आहे.
श्री. जगदाळे हे पुणे येथील सावित्रीबाई फुले
विद्यापीठातील ई-सामग्री विकास आणि नाविन्य उपक्रम शिक्षण विभागात सध्या कार्यक्रम
समन्वयक पदावर कार्यरत असून, गेली 20 वर्षे ते वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाच्या
क्षेत्रात काम करत आहेत.
सोबत : फोटो
जोडला आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.