जिल्हा माहिती कार्यालय कोल्हापूरने जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांची माहिती कमीत कमी वेळेत व्यापक स्वरुपात देण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.
मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०
10 वी, 12 वी परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू
कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षा केंद्राच्या/ उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात दि. 20 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत (ज्या दिवशी परीक्षेचे पेपर नसतील ते दिवस वगळून) दररोज सकाळी 7 वाजल्यापासून ते सायं. 6 वाजेपर्यंत सी.आर.पी.सी. 1973 चे कलम 144 अन्वये मोबाईल फोन बाळगण्यास/ वापरण्यास, झेरॉक्स मशिन, फॅक्स मशिन, पेजर व लॅपटॉप यांचा वापर करण्यास अपर जिल्हादंडाधिकारी भाऊ गलांडे यांनी बंदी घातली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील. हा बंदी आदेश परीक्षेच्या कामकाजासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना व त्यांना नेमून दिलेल्या परीक्षेच्या कामकाजासाठी हाताळाव्या लागणाऱ्या उपकरणांसाठी लागू राहणार नाही.
000000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.