कोल्हापूर,
दि. ६ (जिल्हा माहिती कार्यालय)- उद्या शनिवारी दि. ७ नोव्हेंबर रोजी शासकीय
सुट्टी असली तरी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात
येणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार
संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिक्षक व पदवीधर सार्वत्रिक
निवडणूक २०२० जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार पुणे पदवीधर व शिक्षक मतदार
संघाचा पुणे विभागाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे.
त्या
अनुषंगाने उद्या शनिवारी दि. ७ नोव्हेंबर, रोजी शासकीय सुट्टी असली तरी सकाळी ११
ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार आहेत.
0 0 0 0
0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.