कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर
आणि सीबीएनएएटी चाचणीचे 3445 प्राप्त अहवालापैकी 3246 अहवाल निगेटिव्ह तर 183
अहवाल पॉझिटिव्ह (16 अहवाल नाकारण्यात आले ). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 3118
प्राप्त अहवालापैकी 2856 अहवाल निगेटिव्ह तर 262 अहवाल पॉझिटिव्ह. (417 अहवाल
आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 7141 प्राप्त
अहवालापैकी 6259 निगेटिव्ह तर 882 पॉझीटिव्ह असे एकूण 1327 अहवाल पॉझीटिव्ह आहेत
तर एकूण 28 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 82 हजार 243
पॉझीटिव्हपैकी 1 लाख 64 हजार 323 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर
जिल्ह्यात एकूण 12 हजार 762 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1327 पॉझीटिव्ह
अहवालापैकी आजरा-51, भुदरगड-51, चंदगड-14, गडहिंग्लज-37, गगनबावडा-1, हातकणंगले-134,
कागल-89, करवीर-270, पन्हाळा-61, राधानगरी-48, शाहूवाडी-34, शिरोळ-121, नगरपरिषद
क्षेत्र-101, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 291, इतर जिल्हा व राज्यातील-24 असा
समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची
संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-4870, भुदरगड- 4840, चंदगड- 3678, गडहिंग्लज- 6528,
गगनबावडा- 700, हातकणंगले-20120, कागल-6682, करवीर-27598, पन्हाळा-9513,
राधानगरी-4465, शाहूवाडी-4297, शिरोळ- 11443, नगरपरिषद क्षेत्र-19654, कोल्हापूर
महापालिका 49 हजार 245 असे एकूण 1 लाख 73 हजार 633 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8
हजार 610 असे मिळून एकूण 1 लाख 82 हजार 243 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या
आहे.
जिल्ह्यातील एकूण 1 लाख 82 हजार 243 पॉझीटिव्ह
रूग्णांपैकी 1 लाख 64 हजार 323 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 158
जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची
संख्या 12 हजार 762 इतकी आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.