कोल्हापूर, दि. 15
(जिल्हा माहिती कार्यालय) : जून 2021 रोजी संपणाऱ्या तिमाहीची ई-आर-1 विवरणपत्र
सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडून
त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची, मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती (पुरुष / स्त्री एकूण) संकलीत करण्याचे काम चालू आहे. ही माहिती 31 जुलै पर्यंत या विभागाच्या वेबपोर्टलद्वारे
ऑनलाईन पध्दतीने भरावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन
केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
या कार्यालयाकडून या पूर्वीच युझरनेम व पासवर्ड
देण्यात आलेले आहेत. सर्व शासकीय, निमशासकीय, केंद्र शासन अंगीकृत व राज्य शासन अंगिकृत
व खासगी सर्व आस्थापनांनी त्यांच्या कार्यालयाचे ई-आर-1 विवरणपत्र कौशल्य विकास व उद्योजकता
विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या
संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरावे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.